विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ. अविनाश आचार्य विद्यालय पूर्व प्राथमिक विभागात 'वाटचाल सुदृढतेकडे' वार्षिक प्रकल्प उत्साहात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Feb-2018
Total Views |
 
 
 
विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ. अविनाश आचार्य विद्यालय पूर्व प्राथमिक विभागात
 
'वाटचाल सुदृढतेकडे' वार्षिक प्रकल्प उत्साहात
जळगाव . २७  फेब्रुवारी
दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील पर्यावरणपूरक व मुलांच्या दृष्टीने 'वाटचाल सुदृढतेकडे' हा प्रकल्प राबवला. त्यासाठी प्रमुख पाहूणे म्हणून आपले काही पालक व शालेय समिती सदस्य व विभाग प्रमुख उपस्थित होते.
 
ह्या प्रकल्पातून शाळेने लहान मुलांच्या आहारात काळानुसार झालेला बदल हा त्यांच्या आरोग्यासाठी कसा अयोग्य आहे हे सांगून योग्य तो बदल कोणता ? कसा व कुठे कुठे करावा हे सांगितले. तसेच आजकालच्या मुलांचा शारीरिक व्यायाम हा मोबाईल व टी. व्ही. मुळे नाहीसा होत चाललेला आहे व तो पुढे जाऊन त्यांनाच कसा हानिकारक ठरणार हे पालकांच्या लक्षात आणून दिले. आणि आपले मुल हे चांगल्या पध्दतीने संस्कारीत होवून एक उत्तम नागरिक बनावे त्यासाठी पालकांनी काय करावे हा कानमंत्र ही दिला.तसेच पर्यावरण पूरकतेसाठी आपण दैनंदिन जीवनात करत असलेला प्लॅस्टिकचा वापर टाळला पाहिजे, हा संदेश देखील दिला.आलेल्या पालकांनी आपल्या माहिती संग्रहासाठी कॅमेरात छबी कैद केल्या, जेणे करून त्यांना त्यांच्या पाल्यासाठी आचरणात आणण्यास उपयुक्त ठरतील.
अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. अश्या उपक्रमांद्वारे पुढील भविष्यातील सुजाण नागरिक असलेल्या आजच्या लहान मुलांना जीवनाकडे, आरोग्याकडे योग्य दिशा मिळण्याचा मार्ग गवसतो. प्लास्टिक, मोबाईल वापर, पालकांचा पाल्यांशी असणारा संबंध अश्या विविध महत्वपूर्ण विषयांवर या उपक्रमांद्वारे प्रकाश टाकला गेला.विवेकानंद प्रतिष्ठान पूर्व प्राथमिक विभाग यांचे अभिनंदन. भविष्यात असेच अनेकविध प्रकल्प आयोजित केले गेले पाहिजे. हि विनंती. - डॉ.सौ. विशाखा पाटील.
@@AUTHORINFO_V1@@