निफ्टी दहा हजार बिंदूंपर्यंत गडगडण्याचीही शक्यता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Feb-2018
Total Views |
 
 
निफ्टी दहा हजार बिंदूंपर्यंत गडगडण्याचीही शक्यता
निफ्टी दहा हजार ३०० ते दहा हजार ७०० बिंदूंच्या रेंजमध्ये राहणार
निफ्टी दहा हजार बिंदूंच्याही खाली जाणार?
निफ्टीचे आधार तुटल्यास तो दहा हजार बिंदूंच्याही खाली येणार?
कांद्याच्या घसरणीमुळे शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी!
शेअर बाजारातील सध्याची तेजी ही एक दिलासा रॅली असून तो सध्या दृढीकरणाच्या अवस्थे (कन्सॉलिडेशन) च्या अवस्थेत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. नजीकच्या काळात राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. तो १० हजार ६०० ते १० हजार ७०० बिंदूंपर्यंत जाऊ शकतो. मग मार्च सिरीजमध्ये १० हजार ३०० ते १० हजार ७०० बिंदूंच्या रेंजमध्ये निफ्टी राहणार असून बाजाराची पुढील वाटचाल जागतिक संकेतांवर अवलंबून राहणार असल्याचेही तज्ञांना वाटत आहे. गुंतवणूकदारांना एखाद्या वेळी निफ्टी १० हजार बिंदूंच्या खालीही जाण्याचा धोका पत्करावा लागू शकतो.
 
 
एवढे मात्र खरे की, निफ्टी ची मार्च सिरीजची सुरुवात शुक्रवारी सकारात्मक झाली. त्यामुळे आठवडाअखेरीस निफ्टीत ०.३७ टक्के वाढ दिसून आली. पण फेबु्रवारी सिरीज चे गुरवारी मात्र अत्यंत निराशाजनक वातावरणात ‘सूप वाजले’ होते. संपूर्ण महिनाभरात निफ्टी ६ टक्क्यांनी तर बँक निफ्टी ९ टक्क्यांनी गडगडला होता. ऑप्शन्समध्ये दहा हजार ७०० बिंदूंच्या कॉल स्ट्राईक प्राईसला सर्वात जास्त २९ लाख तर पुटमध्ये दहा हजार स्ट्राईक प्राईसला सर्वात जास्त ३५ लाख शेअरकर्ते मिळाले आहेत.
 
 
दहा हजार ३०० बिंदूंच्या खालच्या पातळीपासून दहा हजार ५०० बिंदूंच्याही वर उसळी घेतलेला निफ्टी पाहता तो कदाचित दहा हजार ८०० ते ११ हजार बिंदूंपर्यंतही जाऊ शकतो असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे तज्ञांनी मार्च सिरीजसाठी दहा हजार ४०० बिंदूंचा कॉल विकत घेऊन दहा हजार ७०० बिंदूंचा कॉल विकण्याचा(शॉर्ट करण्याचा) सल्ला दिलेला आहे. मात्र निफ्टीचे खालचे सर्व आधार तुटल्यास तो दहा हजार बिंदूंच्याही खाली येऊ शकतो असेही भाकित तज्ञांनी वर्तविले आहे.
 
 
बँकांमधील घोटाळ्यांनी भारतीय शेअर बाजारावरील विदेशी गुंतवणुकदारांचा विश्वास उडत चाललेला आहे. पण देशांतर्गत गुंतवणुकदार आता काय करतात यावर लक्ष ठेवणे जरुरीचे झाले आहे. जर म्युच्युअल फंडांमध्ये रक्कम जमा होणे कमी झाले तर बाजार अवश्य कमजोर होणार आहे.
येती कर्नाटक विधानसभा निवडणूक व काही पोटनिवडणुका यांच्या निकालां वर बाजाराची बारीक नजर राहील. जर या निवडणुकांमध्ये केंद्रातील सत्ताधारी भाजपचा पराभव झाला तर बाजारात निराशा पसरणार आहे. तसेच अस्थिरताही निर्माण होणार आहे. तसेच येत्या आठ ते दहा महिन्यातील महत्वपूर्ण राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचाही प्रभाव बाजारावर पडू शकतो. या निवडणुका म्हणजे पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीची ‘सेमी फायनल’(उपान्त्य फेरी)च ठरणार आहेत.
 
 
नीरव मोदी व त्याची गीतांजली जेम्स ही कंपनी यांच्या एलओयु घोटाळ्यामुळे संपूर्ण ज्वेलरी क्षेत्राला फटका बसलेला आहे. तसेच रात्रंदिवस चकाकणार्‍या हिर्‍यांची प्रभाही मावळली आहे. या मामा-भाच्यांच्या जोडीने बँकांना कोट्यावधी रुपयांचा चुना लावून आपले ‘उखळ पांढरे तर केले’. पण त्यांच्या या ‘खेळा’पायी संपूर्ण ज्वेलरी उद्योगाचा ‘जीव’च जाण्याची वेळ आलेली आहे.
 
 
या घोटाळ्यामुळे संपूर्ण उद्योगाची विश्वसनीयता मावळत चालली असून लोकांच्या भावनांना(सेंटिमेंट्स) ठेच लागले ली आहे. याचा प्रभाव एकंदरीत कारभारावर पडलेला आहे. आधीच ज्वेलरी खरेदी करणारे सावधगिरी बाळगीत होते. तशातच या घोटाळ्यानंतर ते आता ‘ताकही फुंकून पिऊ लागले’ आहेत.
 
 
सरकारी नियमांमुळे आधीच त्रस्त झालेल्या हिरा व्यावसायिकांना आता येणारा काळ कठीण जाण्याची भीती वाटू लागलेली आहे. काही ज्वेलर्सच्या मते येत्या सहा महिन्यांपर्यंत या व्यवसायातील मंदी कायम राहणार असून त्यानंतर मात्र ‘अच्छे दिन’ येऊ शकतात. कांद्याच्या भावात पुन्हा घसरण होऊ लागलेली आहे. महाराष्ट्रातील बाजारपेठांमध्ये कांद्याची वाढती आवक पाहता त्याचे भाव आणखीनच गडगडू लागले आहेत. त्याच्या भावात प्रति क्विंटलमागे अडीचशे रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे त्याची गेल्या वर्षभरातील किंमत सर्वात कमी सध्या झाली आहे.
कांद्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या लासलगाव येथे कांद्याचा भाव प्रति क्विंटल २५० रुपयांनी कमी झाला असून तो सध्या १३०० रुपये प्रति क्विंटल या दराने विकला जात आहे. तर पुण्यात तो हजारांच्याही खाली गेला आहे. कांद्याच्या भावातील घसरणीमुळ कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या ‘डोळ्यात पाणी आले आहे. ग्राहकांनाही किरकोळीने कांदा अजूनही २० ते ३० रुपये प्रति किलो भावानेच मिळत आहे. कांद्याचे भाव स्थिर राहावेत यासाठी सरकारने बाजारात हस्तक्षेप करण्याची मागणीही शेतकर्‍यांकडून केली जात आहे.
 
 
सतत दुसर्‍या दिवशीही शेअर बाजारातील तेजी कायम
गेल्या काही आठवड्यांपासून घसरतच असलेला शेअर बाजार आज सोमवारी तेजीत राहिला.
मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक (सेन्सेक्स) शुक्रवारच्या बंद ३४ हजार १४२ बिंदूंवरुन आज सोमवारी सकाळी ३४ हजार २२६ बिंदूंवर उघडून ३४ हजार ४७८ बिंदूंपर्यंत जाऊन आला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) बंद दहा हजार ४९१ बिंदूंवरुन आज सकाळी दहा हजार ५२७ बिंदूंवर उघडून दहा हजार ५९० बिंदूंपर्यंत जाऊन आला. दिवसअखेरीस सेन्सेक्स व निफ्टी हे अनुक्रमे ३४ हजार ४४६ व दहा हजार ५८३ बिंदूंवर बंद झाले.
 
@@AUTHORINFO_V1@@