पत्रकारांनीही साजरा केला 'मराठी भाषा गौरव दिन'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Feb-2018
Total Views |

 



विधानभवनाच्या वार्ताहर कक्षात 'विशाखा'चे अभिवाचन

मुंबई : मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ आणि वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विदयमाने मराठी भाषा दिनानिमित्त विधानभवन येथील पत्रकार कक्षात कवी संमेलनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. यावेळी विशाखा काव्यसंग्रहातील कवितांचे वाचन पत्रकारांनी करत आपली काव्यप्रतिभाही दाखवून दिली.


टी.व्ही ९ चे पंकज दळवी यांनी 'कोलंबसाचे गर्वगीत', दूरदर्शनच्या सोनल चव्हाण यांनी 'मेघास', जनशक्तीचे निलेश झालटे यांनी 'लिलाव', मराठी लाईव्हच्या सीमा महांगडे यांची 'समिधाचा सख्या', दै. मुंबई तरुण भारतचे निमेश वहाळकर यांनी 'पावनखिंडीत', अमृतकलशचे सदानंद खोपकर यांनी 'निर्माल्य', सोलापुर तरुण भारतचे राजेश प्रभू-साळगावकर यांनी 'जा जरा पुर्वेकडे' या कविता यावेळी सादर केल्या. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी या काव्यसंग्रहाला लाभलेली वि. स. खांडेकर यांच्या प्रस्तावनेचे अभिवाचन केले. तर, नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. हेमंत टकले यांनी कुसुमाग्रजांच्या आठवणींना उजाळा देत 'गर्जा जयजयकार' ही कविता सादर केली. वि. स. पागे प्रशिक्षण केंद्राचे संचालक व मुंबई तरूण भारतचे माजी वृत्तसंपादक निलेश मदाने यांनीही आपल्या कविता सादर केल्या. मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर, शामसुंदर सोन्नर यांनी सुत्रसंचालन केले होते. वार्ताहर संघाचे कोषाध्यक्ष महेश पवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचेही विशेष आभार मानण्यात आले.
@@AUTHORINFO_V1@@