सरकार मराठी भाषा विद्यापीठाच्या भक्कमपणे पाठीशी : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Feb-2018
Total Views |



विद्यापीठाकरिता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘ग्रंथाली’ला जागा सुपूर्द

मुंबई : आज मराठी भाषेचा गौरव दिन आहे आणि त्‍याचदिवशी मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या विद्यापीठाच्‍या जागेचा करार आपण करतो आहोत. मराठी भाषेवर काम करणाऱ्या या उपक्रमाच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभे राहील व आवश्‍यक ती मदत यापुढे सरकारकडून करण्‍यात येईल, अशी ग्वाही मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणावीस यांनी दिली. मुंबईत उभारल्या जाणाऱ्या पहिल्या मराठी भाषा विद्यापीठाच्या जागेचा करार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘ग्रंथाली’ संस्थेला सुपूर्द करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.


राज्याचे मराठी भाषा व सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, मुंबई भाजप अध्‍यक्ष व आमदार अॅड. आशिष शेलार यांच्‍यासह ग्रंथालीचे अध्‍यक्ष दिनकर गांगल, ‘पद्मश्री’ मधु मंगेश कर्णिक, कवी डॉ. महेश केळुसकर आदी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले की, मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्‍हावी म्‍हणून प्रयत्‍न करणे आवश्‍यक असल्‍याचे सर्वच साहित्‍यप्रेमींकडून आणि साहित्यिकांकडून बोलले जात आहे. याबाबत सरकारनेही भूमिका घेण्‍याची गरज असून ती भूमिका सरकार नक्‍की घेईल, असे ते म्हणाले. मराठी भाषेचे विद्यापीठ मुंबईत व्‍हावे आणि त्‍यासाठी जागा उपलब्‍ध करून देण्‍यात यावी अशी विनंती ‘ग्रंथाली’ने आमदार अॅड. आशिष शेलार यांच्‍याकडे केली होती. त्‍यानुसार सलग दीड वर्षे पाठपुरवा करून शेलार यांनी आपल्‍या वांद्रे (पश्चिम) विधानसभा मतदार संघात बॅण्‍डस्टॅण्‍ड येथे महापालिकेची जागा यासाठी उपलब्‍ध करून दिली आहे. आज मराठी भाषेचा ‘गौरव दिन’ असून त्‍याच दिवशी मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या विद्यापीठाच्‍या जागेचा करार आपण करतो आहोत, याबाबत मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त करत या विद्यापीठाकरिता सर्वतोपरी मदत राज्य सरकारकडून मिळेल, असे आश्वासनही दिले.

@@AUTHORINFO_V1@@