मुक्ताईनगर नगरपंचायतीसाठी प्रभागांची आरक्षण सोडत जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Feb-2018
Total Views |
 
 
मुक्ताईनगर नगरपंचायतीसाठी प्रभागांची आरक्षण सोडत जाहीर
 
 
मुक्ताईनगर - येथील नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूक २०१८ ची आरक्षण सोडत येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी दुपारी काढण्यात आली.
प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. प्रांत आणि कृऊबाचे सभापती निवृत्ती पाटील यांच्यात काही काळ खडाजंगी झाली. प्रांताधिकारी यांनी माफी मागावी, या मागणीसाठी निवृत्ती पाटील हे ठाम होते. यानंतर एकनाथ खडसे यांचे स्वीय्य सहायक योगेश कोलते यांनी मध्यस्थी करुन या वादावर पडदा टाकला. त्यानंतर वातावरण शांत झाले.
 
 
प्रभागनिहाय आरक्षण असे
 
प्रभाग १ ना.मा.प्र.सर्वसाधारण, प्रभाग २ सर्वसाधारण स्त्री, प्रभाग ३ सर्वसाधारण स्त्री, प्रभाग ४ सर्वसाधारण स्त्री, प्रभाग ५ सर्वसाधारण स्त्री, प्रभाग ६ अनु.जा.सर्वसाधारण, प्रभाग ७ अनु.जमाती सर्वसाधारण, प्रभाग ८ अनु.जाती स्त्री, प्रभाग ९ ना.मा.प्र.स्त्री, प्रभाग १० सर्वसाधारण, प्रभाग ११ सर्वसाधारण, प्रभाग १२ ना.मा.प्र.सर्वसाधारण, प्रभाग १३ ना.मा.प्र.स्त्री, प्रभाग १४ सर्वसाधारण स्त्री, प्रभाग १५ सर्वसाधारण, प्रभाग १६ ना.मा.प्र.स्त्री, प्रभाग १७ सर्वसाधारण.
@@AUTHORINFO_V1@@