स्वच्छता स्पर्धेत गोलाणी व्यापारी संकुल अव्वल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Feb-2018
Total Views |
 
स्वच्छता स्पर्धेत गोलाणी व्यापारी संकुल अव्वल
जळगाव, २६ फेब्रुवारी ः
नीर फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या स्वच्छता स्पर्धेत गोलाणी व्यापारी संकुलाने ‘व्यापारी संकुल’ गटात प्रथम क्रमांक संपादन केला आहे, अशी माहिती सोमवारी गोलाणी मार्केट व्यापारी असोसिएशनचे कोषाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
 
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष कासट, उपाध्यक्ष एन.जे. पाटील, सचिव राम सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती. पुरुषोत्तम टावरी पुढे म्हणाले, आठ महिन्यांपूर्वी शरद काळे नामक व्यक्तीने गोलाणी मार्केटमधील अस्वच्छतेबाबत उपविभागीय दंडाधिकार्‍यांकडे याचिका दाखल केली होती. त्यानुसार उपविभागीय दंडाधिकार्‍यांनी महापालिका आयुक्तांना नोटीस देऊन हे मार्केट बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी गोलाणी मार्केटमधील अस्वच्छतेची पाहणी केली. येथील अस्वच्छतेमुळे त्यांनीही कलम १३३ लावून मार्केट बंदचे आदेश दिले होते. त्यामुळे व्यापार्‍यांनी एकत्र येऊन यासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीत मार्केटच्या स्वच्छतेसाठी महापालिका व व्यापार्‍यांनी एकत्रितपणे काम करण्याचे ठरले. नंतर भीमज्योत महिला बचतगटाच्या माध्यमातून मार्केटची नियमितपणे स्वच्छता सुरू असल्याने चित्र बदलले. काही दिवसांपूर्वी नीर फाउंडेशनने स्वच्छता स्पर्धा घेतली. त्यात गोलाणी मार्केट शहरातील इतर मार्केटच्या तुलनेत सरस ठरल्याने मार्केटला प्रथम क्रमांक मिळाला.
 
 
@@AUTHORINFO_V1@@