बोंडअळी प्रादुर्भावामुळे नुकसान; राज्य शासनाचा भरपाईचा आदेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Feb-2018
Total Views |
 
 
बोंडअळी प्रादुर्भावामुळे नुकसान; राज्य शासनाचा भरपाईचा आदेश
आ. शिरीष चौधरींनी यांच्या पाठपुराव्याला यश
 
 
अमळनेर, २६ फेब्रुवारी
खरीप हंगाम २०१७ मध्ये बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी बाधित शेतकर्‍यांना तसेच तुडतुडे किडीच्या प्रदुर्भावाने धान पिकांच्या नुकसानीपोटी मदत देण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने शासन निर्णय काढून शेतकर्‍यांना मोठा दिलासा दिला, यासंदर्भात अमळनेर मतदार संघातील शेतकर्‍यांना मदत मिळण्यासाठी आ शिरीष चौधरी यांनी मंत्री महोदयाना निवेदन देण्यासह अधिवेशनात देखील आवाज उठविला होता. मात्र शासनाने संपूर्ण राज्यासाठी मदतीचा निर्णय घेऊन शेतकरी बांधवाना दिलासा दिला आहे.
 
 
याबाबत आ चौधरी यांनी दि. २७ नोव्हे २०१७ रोजी कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुडकर यांना अमळनेर मतदार संघातील शेतकर्‍यांना लालबोंड आळीमुळे झालेल्या नुकसानीमुळे भरपाई मिळणेबाबत निवेदन दिले होते, यात त्यांनी अमळनेर तालुक्यात बेमोसमी पावसामुळे कपाशी पिकावर लाल बोंड आळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आला. शेतकर्‍यांचे उच्च प्रतीच्या कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. नुकसान भरपाई मिळणेबाबत शेतकरी बांधवाकडून वारंवार मागणी व विनंती होत आहे. या नुकसानीचे आपल्या स्तरावरून पंचनाम्याचा आदेश काढून त्वरित नुकसान भरपाई संदर्भात संबंधिताकडून तात्काळ योग्य ती कार्यवाही व्हावी अशी विनंती आ चौधरी यांनी केली होती.
 
 
यानंतर नागपूर हिवाळी अधिवेशनात देखील आ. चौधरी यांनी याबाबत विधान मंडळाच्या प्रधान सचिवांना पत्र देऊन अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करत आवाज उठविला होता, याचेच फलित म्हणून शासनाने दि.२३ फेब्रु २०१८ रोजी शासन निर्णय काढून मदतीचा हात पुढे केला आहे. यामुळे शेतकरी बांधवात समाधान व्यक्त होत आहे. या शासन निर्णयानुसार बोंडअळी प्रादुर्भावामुळे पिकांचे ३३%किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान प्रकरणी २ हेक्टरपर्यंत जमीन धारण करणार्‍या शेतकर्‍यांना कोरडवाहू क्षेत्र असल्यास रु ६८०० प्रतिहेक्टर आणि पेरणी क्षेत्राच्या मर्यादेत मदतीची किमान रक्कम रु १००० पेक्षा कमी असणार नाही व बागायती क्षेत्र असल्यास प्रति हेक्टरी १३,५०० मदत मिळणार आहे, तर २ हेक्टरपेक्षा अधिक जमीन धारण करणारे शेतकरी असल्यास कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रती हेक्टरी ६८००/-व बागायती क्षेत्र असल्यास प्रति हेक्टर व १३,५०० मदत मिळणार आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@