स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय समितीचे प्रतिनिधी दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Feb-2018
Total Views |
  
 
 
 
स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय समितीचे प्रतिनिधी दाखल
पहिल्या दिवशी आरोग्य विभागात कागदपत्रांची तपासणी
 
 
जळगाव, २६ फेब्रुवारी ः
स्वच्छ भारत अभियान (नागरी) स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत केंद्रीय समितीचे द्विसदस्यीय पथक सोमवारी सकाळी महापालिकेत दाखल झाले. हे पथक ४ मार्चपर्यंत शहरातील स्वच्छतेच्या कामासंदर्भातील प्रशासकीय कागदपत्रे व इतर बाबींची तपासणी करणार आहे. तसेच शहरातील स्वच्छतेचा प्रत्यक्ष आढावा घेणार आहे. नागरिकांची मतेदेखील ही समिती जाणून घेणार आहे.
 
 
निखिल पाटील व राहुल पाटील अशी केंद्रीय समितीच्या पथकातील दोन्ही प्रतिनिधींची नावे आहेत. नियोजित वेळापत्रकानुसार पहिल्या दोन दिवसात ते महापालिकेच्या स्वच्छतेसंदर्भातील कागदपत्रांची तपासणी करत आहेत. तपासलेल्या कागदपत्रांची माहिती ते लगेचच मोबाईल ऍपद्वारे केंद्र शासनाच्या मिनिस्ट्री ऑफ हेल्थच्या सर्व्हरवर अपलोड करत आहेत. कागदपत्रे तपासणीचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील स्वच्छतेचा प्रत्यक्ष स्थळभेटींद्वारे आढावा घेतला जाणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये भारतातील ४०४१ शहरांचा समावेश करण्यात आला आहे. ४ हजार गुणांची केंद्र सरकारकडून पडताळणी केली जाणार आहे. त्यात कागदपत्र पूर्ततेसाठी १४००, नागरिकांचा अभिप्राय १४०० आणि प्रत्यक्ष पाहणीसाठी १२०० असे एकूण ४ हजार गुणांचा समावेश आहे. या कामासाठी केंद्रीय समिती जळगावात दाखल झाली आहे.
 
 
प्रतिनिधींना दिल्लीतून सूचना
सोमवारी सकाळपासून केंद्रीय समितीचे सदस्य निखिल पाटील यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागातील कागदपत्रांच्या तपासणीला सुरुवात केली होती. दैनंदिन स्वच्छता, ओला व सुका कचरा वर्गीकृत करण्यासाठीची व्यवस्था, घंटा गाड्या, सार्वजनिक कचराकुंड्या आदींबाबतची कागदपत्रे तपासून ते नोंदी घेत होते. त्या नोंदी ते मोबाईल ऍपद्वारे मिनिस्ट्री ऑफ हेल्थच्या सर्व्हरवर पाठवत होते. विशेष म्हणजे, नोंदींची माहिती घेऊन दिल्लीत असलेले अधिकारी त्यांना सूचना देत होते. त्यानुसार ते आरोग्य विभागातील अधिकार्‍यांना माहिती विचारत होते.
 
 
अभिप्रायासाठी स्वतंत्र यंत्रणा
कागदपत्र तपासणी व प्रत्यक्ष पाहणी झाल्यानंतर नागरिकांचा अभिप्राय घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असणार आहे. त्या यंत्रणेत असलेले प्रतिनिधी शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांचे अभिप्राय जाणून घेतील.
@@AUTHORINFO_V1@@