आरेतील वृक्षतोडीस तात्पुरती स्थगिती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Feb-2018
Total Views |

पर्यावरणमंत्र्यांचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश

 

 
 
मुंबई : आरे वसाहतीतील वृक्षतोडीस न्यायालयाचे पुढील आदेश येईपर्यंत तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सोमवारी दिले.
 
आरे वसाहतीतील वृक्षतोडीबाबत व त्यासंदर्भात कोर्टाने दिलेल्या आदेशाबाबत चर्चा करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कारर्पोरेशन लिमिटेड चे संबंधित अधिकारी यांच्या समवेत बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. सदर प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे.
 
या बैठकीदरम्यान मुंबई मेट्रो रेल कारर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक सी. एम. जाधव, सहायक महाव्यवस्थापक आर. ए. पाटील आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी आरे वसाहतीतील वृक्षडीबाबत व त्यासंदर्भात कोर्टाने दिलेल्या आदेशाबाबत चर्चा करताना पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवडीचे नियोजन, आतापर्यत एकूण तोडलेले वृक्ष तसेच भविष्यात तोडाव्या लागण्याऱ्या वृक्षांची संख्या किती असेल या संबंधी चर्चा बैठकीत करण्यात आली. या चर्चेत पर्यावरण मंत्र्यांनी वृक्ष तोडीबाबत शासनाने दिलेल्या नियमाच्या अटींची पूर्तता करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
 
@@AUTHORINFO_V1@@