‘भारत २०१८’ या पुस्तकाच्या डिजिटल आवृत्तीचे अनावरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली : दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या ‘भारत’ या माहितीपर पुस्तकाचे आज नवी दिल्ली येथे अनावरण करण्यात आले आहे. केंद्रीय कापड आणि माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते ‘भारत २०१८’ या पुस्तकाचे आज अनावरण करण्यात आले. यासोबतच स्मृती इराणी यांच्या हस्ते ‘भारत २०१८’ या पुस्तकाच्या ई-आवृत्तीचे देखील अनावरण करण्यात आले.
 
 
 
 
यावर्षी पहिल्यांदाज ‘भारत-२०१८’ या पुस्तकाची ई-आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात ‘एमपीएससी’ आणि केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात ‘यूपीएससी’ देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक अतिशय उपयोगाचे मानले जाते. या पुस्तकात मागील वर्षीच्या सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा समावेश असल्याने या पुस्तकाचा उपयोग आयोगाच्या विद्यार्थ्यांना होतो.
 
 
या पुस्तकाच्या आवृत्ती सोशल साईट असलेल्या अॅमेझोन आणि गुगल प्ले-स्टोअरवर उपलब्ध असतील. मागील वर्षांत भारतात काय घडले याची संपूर्ण माहिती या पुस्तकात असून आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, सरकारच्या योजना अशा सगळ्या विषयांतील माहिती या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे. 
@@AUTHORINFO_V1@@