मराठी भाषा दिनानिमित्त सचिनला आली वडीलांची आठवण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Feb-2018
Total Views |

 
मुंबई :  आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या मराठमोळ्या क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने आज मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषेतून व्यक्त होत आपल्या वडीलांची आठवण काढली. आज २७ फेब्रुवारी म्हणजेच मराठी भाषा दिवस. या निमित्ताने सचिन तेंडुलकर याने मराठी भाषेत ट्विट केले आहे.
"आपल्या विचारांना शब्दाचे सुंदर कोंदण देणारा आजचा दिवस प्रत्येक मराठी माणसाकरिता लाख मोलाचा... मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आज मला माझ्या वडिलांची खूप आठवण होते जे मराठी भाषेचे भक्त होते." अशा भावना त्याने आज ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.
 
 
 
 
 
तसेच व्यक्त होत असताना त्याने आपल्या वडीलांच्या 'मानस लहरी' या काव्य संग्रहातून ध्येय हवे ध्येय हवे ही कविता देखील चाहत्यांपर्यंत ट्विटरच्या माध्यमातून पोहोचवली आहे. यामुळे सचिनच्या सर्व मराठी चाहत्यांना आनंद झाला आहे, तसेच सचिनच्या या मराठमोळ्या पद्धतीने व्यक्त होणे त्याच्या चाहत्यांना भावले आहे.
@@AUTHORINFO_V1@@