कमला मिल : विरोधकांच्याच काळात मोठा भ्रष्टाचार : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Feb-2018
Total Views |


 
 
मुंबई :  कमला मिल येथे लागलेल्या मोठ्या आगीला त्यासंबंधी झालेला भ्रष्टाचार जबाबदार आहे, आणि हा भ्रष्टाचार विरोधकांच्या सत्तेच्या काळातच झाला आहे, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात केला. या संबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. कमला मिल प्रकरणी २००१ मध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. बंद पडलेल्या मिलची जागा ३०% म्हाडा, ३० % महानगर पालिका आणि ३०% मिल मालक अशा प्रकारे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र २००१ मध्ये नियम बदलले आणि मोठा भ्रष्टाचार झाला.
 
 
 
 
कमला मिल मध्ये एकूण ५० हजार स्क्वेअर मीटर बाधकाम करणे शक्य होते, शासनाच्या निर्णयामुळे त्या ठिकाणी ५१ हजार स्क्वेअर मीटर बांधकाम करण्यात आले, त्यामुळे एक इंच जागा म्हाडा किंवा महानगर पालिकेला मिळाली नाही, आणि संपू्र्ण पैसा मिलच्या मालकाला मिळालाय त्यामुळे विरोधकांचं सरकार असताना हा एवढा मोठा भ्रष्टाचार झाला. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
 
तसेच आयटी साठी जागेचा वाटप केल्यानंतर त्या जागेचा वापर आईटी साठीच होतो आहे ना याकडे सरकार पूर्ण लक्ष देईल, तसेच असे न आढळल्यास संपूर्ण पैसा मालकांकडून वळता करुन घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
@@AUTHORINFO_V1@@