एल्फिन्स्टन रोड स्टेशनवरील पादचारी पुल सर्वांसाठी खुला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Feb-2018
Total Views |



लष्कराने पूर्ण केला ३ महिन्यात पूल

मुंबई : मुंबईतील एल्फिन्स्टन रोड स्टेशनवरील पादचारी पुलाचा लोकार्पण सोहळा आज मुंबईत पार पडला. केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. यावेळी या पुलाचे लोकार्पण सामान्य नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.
लष्कराने तब्बल ११७ दिवसात हा पूल बांधून प्रवाशांसाठी खुला केला आहे. याचबरोबर मध्य आणि दक्षिण रेल्वे वरील आंबिवली आणि करी रोड या स्टेशनवरील पादचारी पूलही नव्याने बांधून घेण्यात आले. त्यांचेही लोकार्णण आज झाले आहे. रेल्वे प्रशासनाने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी विक्रमी वेळेत लष्कराच्या मदतीने हे काम पूर्ण केले आहे.

२९ सप्टेंबर २०१७ ला सकाळी एल्फिन्स्टन रोड स्टेशन वरचा पादचारी पूल कोसळून २४ नागरिकांचा मृत्यु झाला होता. यावेळी नागरिकांच्या सुरक्षिततेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले होते.
 
 

@@AUTHORINFO_V1@@