हँकॉक पुलाच्या श्रेयवादावरून काँग्रेस शिवसेनेमध्ये जुंपली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Feb-2018
Total Views |

कार्यक्रमावर काँग्रेसचा बहिष्कार
उद्या पुन्हा करणार भूमीपूजन
 
 

 
 
मुंबई : सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाजवळील ब्रिटीशकालीन हँकॉक पुल दोन वर्षांपूर्वी पाडण्यात आला होता. त्याची पुर्नबांधणी करण्यात येणार आहे. त्याच्या भूमिपूजनाच्या श्रेयावरून काँग्रेस शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपली आहे. या कामाचे काल महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले तर या पुलाचे काँग्रेसकडून आता मंगळवारी पुन्हा भूमीपूजन केले जाणार आहे.
 
सोमवारी झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. य़ा परिसरात पुलाच्या श्रेयाचे शिवसेना, काँग्रेसचे बॅनर्सही झळकले आहेत. हँकॉक पुलाची लांबी ६४.६२ मीटर, रुंदी ३०.०८ मीटर असून पुलाचे पृष्ठीकरण डीबीएम आणि मास्टिक अस्फाल्टचे असणार आहे. आर.सी.सी.वॉल टाईप पाईल्स पद्धतीचे या पुलाच्या पायाचे बांधकाम असणार आहे. तसेच स्टील गर्डर व आर.सी.सी. डेक स्लॅब अशा प्रकारचे बांधकाम केले जाणार आहे.
 
दोन वर्षांपूर्वी जीर्ण झालेला आणि धोकादायक स्थितीत असलेला हँकॉक पुल पाडण्यात आला होता. परंतु येथे पूल नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. रेल्वेने व महापालिकेने पुल पाडण्यापूर्वी पर्यायी व्यवस्था केली नव्हती हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयानेही पालिका आणि रेल्वेला खडेबोल सुनावले होते.त्यानंतर महापालिकेने पुलाच्या उभारणीसाठी निविदा मागविल्या होत्या. त्यास ४ कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला. यामध्ये मेसर्स साई प्रोजेक्ट्स प्रा. लि. ने सर्वात कमी खर्चात पुल उभारण्यासाठी निविदा भरली होती. मेसर्स साई प्रोजेक्ट्स प्रा. लि. ला ५१ कोटी ७० लाख १२ हजार ९२९ रुपये इतका खर्च करून पुल उभारण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. त्यामुळे दोन वर्षानंतर या पुलाच्य़ा भूमीपूजन करण्यात आले.
 
हँकॉक पुलाच्या श्रेयवादावरून काँग्रेस शिवसेना आमने सामने आली आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला काँग्रेसने बहिष्कार घातला. उद्या पुन्हा काँग्रेसकडून भूमिपूजन करण्यात येणार आहे.

 
शिवसेनेकडून सत्तेचा गैरवापर
 
माझगाव आणि डोंगरीला हँकॉक पुल जोडला जाणार आहे. हा पूल प्रभाग क्रमांक २३ आणि २१० अशा दोन प्रभागांना जोडला असून या प्रभागातून काँग्रेसच्या स्थानिक नगरसेविका सोनम जामसूतकर आणि निकीता निकम प्रतिनिधीत्व करतात. या कार्यक्रमाबत आपल्या पूर्व पूर्वसूचना देण्यात आली नाही. प्रशासन राजशिष्टाचाराचे उल्लंघन करीत आहे. शिवाय शिवसेना सत्तेचा गैरवापर करीत असल्याचा आरोपही जामसूतकर यांनी म्हटले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@