विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतली कुलगुरूंची मुलाखत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Feb-2018
Total Views |
 
 

विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतली कुलगुरूंची मुलाखत

जळगांव, २६ फेब्रुवारी

विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विविध विभागांना भेट देऊन त्यांची माहिती घेतली त्यासोबतच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांच्याशी संवाद साधून विविध प्रश्नांची उत्तरे मिळवून घेतली.

विद्यार्थ्यांना भावी आयुष्यामध्ये आपणाला उच्च शिक्षणाचे महत्त्व काय आहे व ते आपण कशा पद्धतीने व कोठून मिळवू शकतो याबद्दल माहिती मिळवून घेण्यासाठी विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलच्या इ. ८ वी च्या विद्यार्थ्यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला भेट दिली व तेथील विविध विभागांना भेट देऊन त्या विभागांबद्दल माहिती घेतली.

या प्रसंगी विद्यार्थ्यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील भव्य अशा ग्रंथालयाला भेट देऊन त्या ठिकाणी पुस्तकांचे व ग्रंथालयाचे महत्त्व समजून घेतले तसेच रुसा सामावेशी शिक्षण संसाधन केंद्र तसेच महात्मा गांधी संशोधन केंद्र त्या ठिकाणी असलेले ऐतिहासिक वस्तूंचे संग्रहालय, स्कूल ऑफ लाइफ सायन्स, स्कूल ऑफ इन्व्हायर्नमेंट इत्यादी विभागांना भेट देऊन त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली व ती माहिती देण्यासाठी त्या विभागाच्या विभाग प्रमुखांनीही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणातील विविध अभ्यास विषय कसे असतात याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. भविष्यात विद्यार्थ्यांना हि माहिती अतिशय महत्त्वाची ठरेल व संशोधन क्षेत्रातील काम कसे असते याविषयी मार्गदर्शन केले.

कुलगुरूंशी संवाद :-

या क्षेत्र भेटीच्या वेळेस इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांनी कुलगुरूंशी संवाद साधला व त्या वेळेस कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना अगदी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळेस कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना आयुष्यात ध्येय निश्चित करा.असे सांगून ध्येय निश्चितीचे महत्त्व पटवून दिले. तसेच ठरवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत रहा, कष्ट करा व ध्येय निश्चित करून त्यासाठी योग्य ते प्रयत्न व मेहनत केल्याने आपण कसे साध्य करू शकतो हे विद्यार्थ्यांना पटवून सांगितले.

या क्षेत्र भेटीचे संपूर्ण नियोजन पंकज कुलकर्णी यांनी केले व त्यांच्या सोबत निलेश चौधरी , मुकुंद शिरसाठ , प्राजक्ता यावलकर, दिपाली भामरे , मीनाक्षी महाजन हे उपस्थित होते. सदर प्रकल्प भेटीच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील सर व समन्वयक गणेश लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले.

 
@@AUTHORINFO_V1@@