वैद्यकीय सेवेलाच मानले समाजसेवा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Feb-2018
Total Views |
 
 
वैद्यकीय सेवेलाच मानले समाजसेवा
भुसावळ येथील कुंदलता थूल गेल्या २५ वर्षापासून रुग्णसेवेत!
जळगाव- 
रुग्णसेवा हीच ईश्‍वरसेवा आहे, असे वैद्यकीय क्षेत्रात मानले जाते. रुग्णांवर योग्य उपचार करणे, सुश्रूषा करणे, ऐनवेळी आलेल्या रुग्णांवर उपचार करणे हेच वैद्यकीय सेवेतील कर्तव्य आहे. भुसावळ येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये २५ वर्षांपासून नर्सिंग पदावर कार्यरत असलेल्या कुंदलता थूल या महिलांसाठी विविध उपक्रम राबवित
आहेत.
 
 
मूळच्या नागपूर येथील रहिवासी असलेल्या कुंदलता थूल यांचा ज्ञानोबा थूल यांच्याशी १९८८ मध्ये विवाह झाल्यावर त्या वर्धा जिल्ह्यातील दुरुगवाडा या सासरच्या गावी आल्या.१२ वीचे शिक्षण घेत असतांना वैद्यकीय क्षेत्रात रूजू व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी दोन वर्षाचा नर्सिंग कोर्स पूर्ण केला. त्यांचे पती भारतीय लष्करात कार्यरत होते. आपल्या पत्नीनेही या माध्यमातून समाजसेवा करावी यासाठी कुंदलता यांना त्यांनी वेळोवेळी पाठिंबा दिला.
 
 
१९९२ मध्ये त्यांना रेल्वे हॉस्पिटल, भुसावळ येथे नोकरी मिळाली, संयुक्त कुटुंबाची जबाबदारी, मुलांचे संगोपन या सर्व जबाबदार्‍या त्यांनी चोखपणे पार पाडल्या. त्यांनी मेडिकल, सर्जरी, आर्थोपेडिक या सर्व विभागात जबाबदारी पार पाडली आहे. सध्या त्या चीफ मेट्रन या पदावर कार्यरत असून हॉस्पिटलमध्ये येणार्‍या रुग्णांच्या सेवेसाठी त्या तत्पर असतात. त्यासोबतच महिलांच्या विविध समस्या जाणून घेता याव्यात यासाठी त्या तळमळीने आरोग्याविषयी मार्गदर्शन देखील करत असतात.कौटुंबीक जबाबदार्‍या पार पाडतांना महिलांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होऊन त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे शिबिराचा अनेक महिलांना लाभ झाला असून आरोग्याबाबत त्या जागरूक झाल्या आहेत, असेही कुंदलता थूल यांनी ‘तरूण भारत’ शी बोलताना सांगितले.
 
 
महिला दिनानिमित्त विशेष उपक्रम
महिला दिनानिमित्त रेल्वे हॉस्पिटलमध्ये दरवर्षी विशेष उपक्रम राबविला जातो. आरोग्य तपासणी शिबीर, विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या यशस्वी महिलांचे व्याख्यान, वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेता महिलांनी स्वतःची सुरक्षा कशी करावी, यासह विविध आणि विशेष उपक्रमांवर कुंदलता यांचा भर असतो.
 
@@AUTHORINFO_V1@@