अमळनेरात महिलांकडून रास्ता रोको

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Feb-2018
Total Views |
 
 


अमळनेरात महिलांकडून रास्ता रोको

महिला मंचच्या वतीने प्रांताधिकार्‍यांना निवेदन देवून

जळगाव, 26 फेब्रुवारी

 अमळनेर महिला मंचच्या वतीने कळमसरे व दोंडाईचा येथील घटनेचा विरोधात मुकमोर्चा काढण्यात आला व प्रांताधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

तालुक्यातील कळमसरे येथे जिल्हा परीषद शाळेतील शिक्षकाकडुन चिमुकल्या विद्यार्थीनींवर वेळोवेळी अश्‍लील चाळे व लज्जास्पद कृत्य करण्यात आले व त्याचप्रमाणे दोंडाईचा येथील नुतन हायस्कूल येथे शिकणार्‍या पाच वर्षीय चिमुरडीला चॉकलेटचे अमिष दाखवून लैंगिक शोषण करण्यात आले. या दोन्ही घटना सामाजिक जिवनाला बाधा आणणार्या व पुरोगामी महाराष्ट्राला तसेच पवित्र अश्या शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी आहे. यामुळे पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे

त्यामुळे अमळनेर महिला मंचच्या वतीने निषेध करीत अमळनेर प्रांताधिकारी गायकवाड यांना निवेदन देऊन या दोन्ही घटनेस जबाबदार नराधमांना कठोर शिक्षा व्हावी व पुन्हा शिक्षकी पेशात नियुक्ती करू नये मुली आणि महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी शासनाने काटेकोर पाळावी अमळनेर शहरात डी आर कन्या शाळा, प्रताप महाविद्यालय, सानेगुरुजी, मंगलमूर्ती चौक, तसेच भागवत खाजगी क्लासेस परिसर याठिकाणी निर्भया पथक साध्या कपड्यातील पोलीस आदींची व्यवस्था करीत टारगट विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करावी, शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत, भविष्यात अश्या घटना घडु नयेत यासाठी शासनाने व प्रशासनाने योग्य व कठोर उपाययोजना करण्यात यावी, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

@@AUTHORINFO_V1@@