मरणाचे सोहळे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Feb-2018
Total Views |

 


 
 
 
 
माध्यमात वाढणारा तुटलेपणा दिशाहीन समाजाला विचित्र वळणावर नेऊन ठेवणारा असेल. मजकुरातला रितेपणा आणि त्याचे सनसनाटीकरण करण्यासाठी मृत्यूचेही सोहळे केले जात आहेत. 
 
 
बॉलीवूडची ख्यातनाम नायिका श्रीदेवी हिचा परवा दुबईत दुर्दैवी मृत्यू झाला. आता एका यशस्वी नायिकेचा मृत्यू आणि त्यामुळे व्यक्त होणारी हळहळ ही नैसर्गिकच मानली पाहिजे. सिनेमासारख्या माध्यमातून निर्माण झालेली व्यक्तिमत्त्वे नेहमीच लोकमानसाच्या जवळची असतात. त्यामुळे त्यांचे असे अकाली जाणे सगळ्यांनाच चटका लावून जाते. मात्र, श्रीदेवीच्या मरणाचाहीमजकूरनिर्माण करण्याचे जे प्रयत्न सध्या वृत्तवाहिन्यांवर आणि मुक्तमाध्यमांवर सुरू आहेत, ते केवळ आणि केवळ आपल्या माध्यमांमधील मजकुरांचा अभाव आणि त्यांचे रितेपणच दर्शवितात. श्रीदेवीच कशाला अशा प्रकारचे कोणीही गेले की, त्यानंतर सुरू होणारी शोधपत्रकारिता ही समाजात उबग आणणारी आहे. श्रीदेवी कशी गेली? ती वजन कमी होण्यासाठी काय करीत होती? त्यात तिने जे केले त्याचे तिच्या शरीरावर काय परिणाम झाले? अशा प्रकारे आहाराची पथ्ये केल्याचे काय दुष्परिणाम असतात? हे आणि असे कितीतरी मजकूर सध्या मुख्य माध्यमात आणि मुक्त माध्यमात तरंगत आहेत. यावरून लोकांनाच सल्ले देण्याचा रतीब छाप कार्यक्रमही सुरू झाला आहे. एका आघाडीच्या वाहिनीने आपल्याच स्टुडिओतील पत्रकारांच्या मुलाखती घेऊन श्रीदेवीच्या मृत्यूवर कार्यक्रमदेखील केला आहे. हे सारे होत असतानाच श्रीदेवीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झालेला नसून अपघाती असल्याच्या बातम्या आज येत आहेत. त्यामुळे आता काल इतका मजकूर आला. त्याची दुसरी आवृत्ती येणार यात काहीच शंका नाही. महत्त्वाचे म्हणजे काल आपण काय बोललो याचे कुणालाही भान नाही. समाजात जे काही आज चालू आहे, त्याचे काय करावे हाच एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
 
 
लोकशाहीत माध्यमे नागरिकांना विचार प्रवृत्त करणारा मजकूर पुरवतात. जर मजकूर पुरविणार्‍यांची ही दशा झाली असेल तर समाज कुठल्या दिशेला जाईल हे कोण सांगणार? माध्यमांचे हे तुटलेपण आजचे नाही. गेल्या काही वर्षांत ही प्रक्रिया अत्यंत गतीने सुरू आहे. पहिल्या पिढीतल्या विचारवंतांकडे काही तरी वैचारिक मजकूर होता. त्याच्या विचारपद्धतीचे झुकलेपण कुठल्याही बाजूला असले तरी त्याच्याशी किमान मतभेद तरी असू शकत होते. आता मात्र बिनडोकपणाकडेच सगळ्याची वाटचाल सुरू झाली आहे. कुणीतरी मूल्यांची पोपटपंची करीत राहायची आणि उरलेल्या लोकांनी तिचा उदो उदो करीत राहायचा, असा एक शेळपट शिरस्ता निर्माण झाला आहे. याचे सर्वात गंभीर टोक दिसायला लागले होते ते अमेरिकन निवडणुकांच्या वेळी. हिलरी क्लिंटनचे प्रचाराचे शेवटचे भाषण इतके उत्तम होते की, त्या भाषणाप्रमाणे बाई वागल्या आहेत किंवा वागतील असा विश्वास अमेरिकेतील सर्वसामान्य जनतेला वाटला असता, तर त्यांनाच निवडून दिले गेले असते. मात्र, लोकांनी निवडून दिले डोनाल्ड ट्रम्प यांना. आपलेही अनेक देशी पत्रकार अमेरिकन माध्यमांप्रमाणे आपल्या आकलन क्षमतेच्या नशेत होते. ट्रम्प कसे वाईट हे सांगण्यात ही मंडळीदेखील आघाडीवर होती. आपला अंदाज चुकला आहे, हे मान्य करण्याचा मोकळेपणादेखील यांच्याकडे नव्हता. उलट ट्रम्प निवडून आल्यावर जगबुडीच्या आशयाचे अग्रलेख लिहिले गेले. यातल्या काही लोकांना तर ट्रम्प हे आपले राष्ट्रपती किंवा पंतप्रधान नाहीत असे हलवून सांगण्याची वेळ आली होती. आजही त्यात काही फारसा फरक पडलेला नाही. ट्रम्प का जिंकले? याचा विचार करावा लागेल.
 
 
जगभरातील डाव्या विचारांच्या पत्रकारांनी आणि विचारवंतांनी एक अलिखित समझौता केला आहे. वैचारिक क्षेत्रातल्या जागा त्यांच्यासाठी मोकळ्या ठेऊन जे काही लोक सत्तेत राहू इच्छितात त्याच्या मागे उभे राहायचे आणि इतरांच्या वाटेला राखीव विद्वेष पेरत राहायचा हा शिरस्ता झाला आहे. भारतात त्याचा परिचय तर वारंवार येतच असतो. आता अशा प्रकारच्या वाचकांनाच दिशाहीन करणार्‍या मजकुरातून काय सिद्ध होणार? मग जेव्हा ऐरणीवर यायचा प्रसंग येतो तेव्हा या तथाकथित विचारवंतांचे ठोकताळे सपशेल फसतानाच दिसतात. ज्यांच्यावर समाजमनाला आकार देण्याचे काम असते त्याचेच आकारमान बिघडलेले असेल तर अपेक्षा कुणाकडून ठेवणार? मग यातून देखावे निर्माण केले जातात आणि या मंडळींच्या विचारवंतांच्या कुवतीनुसारच उत्तरे शोधली जातात. हा साराच बनाव आहे. पर्यायाने ही व्यासपीठे मृतप्राय होण्याचीच शक्यता जास्त आहे.
 
फोर्ट भागात पुस्तकांसाठी प्रसिद्ध असलेल्यास्ट्रँडया पुस्तकाच्या दुकानाच्या बंद होण्याची बातमीही अशीच खपविली गेली. पुस्तकाचे दुकान बंद होत आहे, हे खोटे नाही. मात्र, त्यानिमित्ताने वाचन संस्कृती धोक्यात आली असल्याची ओरड आणि त्यावर केल्या गेलेल्यास्टोरीमात्र बिनडोकपणाच्या मानल्या पाहिजेत. वस्तुत: ‘स्ट्रँडचे मालक टी. एन. शानबाग यांनी हा व्यवसाय सुरू केला. केवळ पुस्तके विकण्यापेक्षा दर्दी वाचकांना हवी ती पुस्तके मिळवून देण्यात त्यांनी धन्यता मानली होती. त्यांच्या पुढच्या पिढीला मात्र ते जमले नाही. ‘स्ट्रँडबंद होण्याची कारणे तपासली तर पुस्तकांची ऑनलाईन खरेदी हे त्यामागचे मोठे कारण सांगितले जात आहे. असे असले तरी पुस्तकांची खरेदी करणार्‍यांनी स्वत:ला रोखलेले नाही. अत्यंत कल्पकपणे चालविले जाणारेकिताबखानादेखीलस्ट्रँडपासून काही अंतरावर व्यवस्थित सुरू आहे. मुद्दा एवढाच की, आपल्या कुवतीनुसार कुणी कसला सोहळा करायचा ठरविला की काय मजकूर निर्माण होईल? 
@@AUTHORINFO_V1@@