पालिका व्यापार संकुलात असलेले मद्याची दुकाने बंद करा.- जयश्री पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Feb-2018
Total Views |
 
 

पालिका व्यापार संकुलात असलेले मद्याची दुकाने बंद करा.- जयश्री पाटील

एरंडोल शहरातील नगरपालिकेच्या व्यापार संकुलात सुरु असलेली परवानाधारक मद्य विक्रीच्या दुकानांचे नाहरकत पत्र रद्द करून सदरची दुकाने बंद करण्यात यावीत अशी मागणी नगरसेविका जयश्री पाटील यांनी पालिकेच्या सर्व साधारण सभेत नगराध्यक्ष रमेश परदेशी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.नगरसेविका पाटील यांनी केलेल्या मागणीस सर्व नगरसेवकांनी एकमुखी पाठींबा दिला आहे.

नगरसेविका जयश्री पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि शहरात नगरपालिकेच्या मालकी असलेल्या अनेक व्यापार संकुलांमध्ये देशी तसेच विदेशी दारूची विक्री करणारी दुकाने सुरु आहेत.सदर दुकाने शासकीय नियमांना धाब्यावर बसवुन खुलेआम पणे सुरु आहेत.दारू विक्रीच्या दुकानांमुळे शेकडो कुटुंबांचे आयुष्य उद्वस्त होत असुन मद्य प्राशन करणा-या मद्यपी कडून रस्त्यावर चालना-या महिलांना तसेच सर्व सामान्य नागरिकांना त्रास होत आहे.नगरपालिकेच्या अधिकृत व्यापार संकुलांमध्ये खुलेआम पणे मद्यविक्री होत असल्यामुळे नगरपालीकाच मद्यविक्रीला प्रोत्साहन देत असल्याची प्रतिक्रिया सर्व सामान्य नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.सदरच्या मद्य विक्रेत्यांना कोणत्या आधारे नाहरकत प्रमाण पत्र देण्यात आले याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.तसेच सदरच्या देशी विदेशी मद्य विक्रेत्यांचे नाहरकत प्रमाण पत्र त्वरित रद्द करून त्याचे करार रद्द करून नविन नुतनीकरण करण्यात येऊ नये.शहरातील प्रमुख रस्त्यांवर शाळा व महाविद्यालय असल्यामुळे विद्यार्थ्यांची ये जा या ठिकाणावरून असते.मात्र मद्यपींचा त्रास विद्यार्थ्याना देखील होत असुन यामुळे शहरात अप्रिय घटना घडण्याची भीती आहे.याबाबत पालिकेने त्वरित दखल घेऊन व्यापार संकुलांमध्ये सुरु असलेल्या देशी विदेशी मद्यविक्रीच्या दुकानांचे नाहरकत प्रमाण पत्र त्वरित रद्द करावे तसेच त्यांचे नविन नुतनीकरण करण्यात येऊ नये असा ठराव मंजूर करून त्याची प्रत दारू बंदी खात्यास देण्यात यावी अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली असुन निवेदनावर उपनगराध्यक्षा छाया दाभाडे,जाहिरोद्दिन शेख कासम,अभिजित पाटील,वर्षा शिंदे,हर्षाली महाजन,दर्शना ठाकुर,नितीन महाजन,कल्पना महाजन,कृणाल महाजन,डॉ.सुरेश पाटील,आरती महाजन,योगेश देवरे,सुरेखा चौधरी,अब्दुल शकुर अ.लतीफ मोमिन,बानोबी बागवान,नितीन चौधरी,असलम पिंजारी,राष्ट्रवादीच्या गटनेत्या सरलाबाई पाटील,प्रतिभा पाटील,डॉ.नरेंद्र ठाकुर,प्रा.मनोज पाटील आदी सर्व नगरसेवकांच्या स्वाक्ष-या आहेत.दरम्यान नगरसेविका जयश्री पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेचे शहरातील महिला वर्गांकडून स्वागत करण्यात येत आहे.


@@AUTHORINFO_V1@@