भुसावळ शहराच्या स्वच्छता सर्वेक्षणाला सुरवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Feb-2018
Total Views |
 
भुसावळ शहराच्या स्वच्छता सर्वेक्षणाला सुरवात
भुसावळ, 26 फेब्राुवारी
गेल्यावर्षी देशातील घाणेरडया शहरात भुसावळ शहराची गणना झाली होती. या नंतर भुसावळ नगरपालिकेने हा कलंक पुसून टाकण्यासाठी घंटागाडया शहरात सुरू केल्या आहेत. तसेच ठिकठिकाणी कचराकुंडीची व्यवस्था अशा विविध उपाय करून अंमलबजावणी केली. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत हैद्राबादच्या मे.काव्र्ही लिमिटेड एजन्सीच्या तीन अधिका­यांडून शहराच्या सर्वेक्षणाला सुरवात झाली आहे.
हे तीन अधिकारी सोमवार पासून पाच दिवस शहराचे सर्वेक्षण करणार आहे. केंद्र सरकारने देशातील 4 हजारंपेक्षा अधिक शहरांचे स्वच्छ सर्वेक्षणाचे नियोजन केले आहे. तीन टप्प्यात भुसावळ शहराचे सर्वेक्षण होणार आहे.त्यात दोन दिवस शहरातील नागरिकांकडून स्वच्छतेची माहिती घेतली जाणार आहे.उर्वरीत दिवसात पालिकेने केलेल्या उपाययोजनांची कागदोपत्री माहिती घेण्यात येणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@