भुसावळ नगरपालिकेची अर्थसंकल्पीय सभा 3 मिनीटात आटोपली 144 कोटी 83 लाखांचा अर्थ संकल्प

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Feb-2018
Total Views |
भुसावळ नगरपालिकेची अर्थसंकल्पीय सभा 3 मिनीटात आटोपली
 
144 कोटी 83 लाखांचा अर्थ संकल्प

 
 
 
 
 
 
भुसावळ, 26 फेब्राुवारी
भुसावळ नगरपालिकेची अर्थसंकल्पीयसभा सोमवाररोजी सकाळी 11 वा. गोपाळनगर येथील कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.या सभेवर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता.सत्ताधा­यांनी सर्व विषयांना हात उंचावून मंजुरी देत सभा गुंडाळली.या सभेत 144 कोटी 83 लाख 5 हजार रुपयांचा आणि 64 लाख 63 हजारांचा 344 रुपये शिलकी अर्थसंकल्प कोणतीही करवाढ न करता केवळ तीन मिनिटात मंजुर करण्यात आला.
 
 
या सभेला व्यासपीठावर प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर, उपगटनेता शोभा नेमाडे उपस्थित होत्या.ही सभा अर्थसंकल्पीय असल्याने त्यात सविस्तर चर्चा होणे अपेक्षीत होते.परंतु विरोधकांनी बहिष्कार टाकल्याने त्यांची अनुपस्थिती होती. प्रा.डॉ.सुनिल नेवे यांनी स्थायी समितीच्या बैठकित अर्थ संकल्पावर सविस्तर चर्चा झाल्याने सर्व विषयांना मंजुरी असल्याचे संागत सर्व सत्ताधा­यांनी त्यास समर्थन केले. त्यामुळे केवळ एका मिनिटात सभा गुंडाळली गेली.
 
 
या अंदाजपत्रकात अमृत योजने अंतर्गत 45 एमएलडी चे नविन जल श्ुध्दीकरण यंत्रणा बांधणे, संपुर्ण शहरात नविन जलवाहिका टाकणे, 11 जलकुंभ बांधणे,शहरात हरीतपट्टा विकसीत करणे.वृक्षारोपण, बगीचे, रस्ते ,गटारी , पुतळे उभारणी, 14 व्या वित्त आयोगा अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन व विल्हेवाट , अपंगाकरीता व महिलांकरीता विविध प्रशिक्षण तसेच पालिकेची भव्य प्रशासकिय इमारत बांधणे या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे.
 
 
अमृत योजने अंतर्गत शहरात पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी केंद्र शासनाकडून 30 कोटी रुपयांचा पहिला टप्पा मिळणे अपेक्षीत आहे. नविन वस्त्यांमध्ये रस्ते बांधण्यासाठी 2 कोटी रुपये तरतुद करण्यात आली आहे. अल्पसंख्याक योजने अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण आणि शौचालय बांधण्यासाठी 50 लाख रुपये, शिवाजी महाराजांच्या पुतळयासाठी 50 लाख रुपये, नविन गटारांसाठी न.पा. निधीतुन 2 कोटी रुपये तरतुद करण्यात आली आहे.
144 कोटी 83 लाख 5 हजार खर्चाचा तर 64 लाख 63 हजार 344 रुपये शिलकिचा अर्थसंकल्प वाचन मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांनी केले.
 
 
विरोेधकांची सभेकडे पाठ
नगराध्यक्षंाकडे मुख्याधिकारी यांनी 31 डिसेंबर पर्यंत मागील 9 महिन्यांचे विवरणपत्र सादर करून आगामी वर्षाचा वित्तीय अंदाज व चालु वर्ष अखेरीस शिल्लक रकमेचा अंदाज सादर केला पाहिजे होता. त्यानुसार 15 जानेवारी पर्यंत नगराध्यक्षांनी स्थायी समितीची सभा बोलविणे बंधनकारक असतांना तसे झाले नाही.मुख्याधिका­यांनी जिल्हाधिका­यांना कळवून जिल्हाधिका­यांनी मिटींग बोलविली पाहिजे आणि त्यामध्ये स्थायी समितीच्या शिफारशी घेणे आवश्यक असतांना 31 जानेवारी पर्यंत नगरपालिकेकडून असे काहीही झाले नाही. सत्ताधारी हे जाणिवपुर्वक विरोधकांच्या वार्डातील कामे घेत नाहीत. त्यांच्या वार्डात स्वच्छता केली जात नाहीत यामुळे अर्थसंकल्पीय सभा ही नियमबाहय असल्याने बहीष्कार असल्याचे विरोधीपक्ष गटनेता उल्हास पगारे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
@@AUTHORINFO_V1@@