मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्य मध्यवर्ती ग्रंथालयात विविध कार्यक्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Feb-2018
Total Views |

 
 
मुंबई : ज्येष्ठ कवी ज्ञानपिठकार वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्मदिन हा राज्यभर ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून २७ फेब्रुवारी २०१८ रोजी राज्य शासनाच्यावतीने राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, नगरभवन मुंबई येथे दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘मायबोली मराठी’ या विषयावर ज्येष्ठ कवी अरूण म्हात्रे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेला ‘वंचितांचा रंगमंच’ या चळवळीतील कलाकारांचा मराठी भाषाविषयक नृत्याविष्कार शालेय मुलांच्या गटाद्वारे सादर केला जाणार आहे. याचबरोबर मराठी साहित्यिकांच्या निवडक साहित्यकृतींच्या ग्रंथ प्रदर्शनाचा आस्वाद साहित्यिक प्रेमी घेऊ शकणार आहेत.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संपदा मेहता, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसचिव सिद्धार्थ खरात, ग्रंथालय संचालक किरण धांडोरे हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास जास्तीत जास्त मराठी रसिकांनी उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन ग्रंथपाल शशिकांत काकड यांनी केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@