राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान विरोधकांचा सभात्याग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Feb-2018
Total Views |

मराठीचा अपमान केल्याचा सरकारवर आरोप


 
मुंबई : आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन विधानसभेत सुरू झाले आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरूवात झाली. मात्र, राज्यपालांचे अभिभाषण मराठीत अनुवादित न केल्यामुळे विरोधकांनी यावेळी सभागृहातून काढता पाय घेतला.

राज्यपालांचे अभिभाषण मराठीत अनुवादित न करून फडणवीस सरकारने मराठी भाषेचा अवमान केला आहे. मराठी विरोधी सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकून सभात्याग करून विधानभवनातील शिवरायांच्या प्रतिमेजवळ सरकार विरोधी घोषणा देऊन सरकारचा धिक्कार केला असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
 

त्याचबरोबर, या भाषणाचा मराठी अनुवाद न होता गुजराथी आणि इंग्रजी अनुवाद होत असले तर ही भयंकर बाब आहे असही मुंडे यावेळी म्हणाले आहे.  

 
तर, अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांचे अभिभाषण मराठीत भाषांतरित न होणे निंदनीय आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं. मराठी भाषेचा जाणीवपूर्वक अवमान सरकारतर्फे केला जात आहे. मराठी भाषेसाठी आवाज उठवणारी शिवसेनाही यावर आक्षेप घेत नाही, हे दुर्भाग्य असं आमदार सुनील तटकरे यांनी म्हणलं आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@