सृजन’ अंतर्गत नागपूर व पुणे रेल्वे स्थानकांची निवड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Feb-2018
Total Views |

 
 
नवी दिल्ली : सर्वांच्या सहकार्यातून रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास अर्थात ‘सृजन’ या रेल्वे मंत्रालयाच्या अभिनव उपक्रमांतर्गत नागपूर रेल्वे स्थानकासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा आराखडा तर एकात्मिक व्यवस्थापन निर्माण करण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकाची निवड करण्यात आली आहे.
 
रेल्वे मंत्रालयाच्या भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाच्या वतीने २६ जानेवारी २०१८ रोजी देशातील ६३५ महत्वाच्या रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी सृजन हा कार्यक्रम MyGov पोर्टलवर सुरु करण्यात आला आहे, त्यामध्ये या दोन रेल्वे स्थानकांची निवड करण्यात आली आहे. भागधारक, रेल्वे प्रवासी, शहर नियोजनकर्ते, वास्तुविषारद, अभियंते यांच्या सहभागातून हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
 
सृजन कार्यक्रमांतर्गत नागपूर रेल्वे स्थानकासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा आरखडा तयार करण्याकरिता आयोजित स्पर्धेचा पहिला टप्पा नुकताच पार पडला आहे. नागपूरसह ग्वालियर आणि बयप्पनहल्ली या रेल्वे स्थानकांचाही यात समावेश आहे. या स्पर्धेचा दुसरा टप्पा ३१ मार्च २०१८ पर्यंत पूर्ण होणार आहे.
 
देशातील ५ रेल्वे स्थानकांसाठी एकात्मिक व्यवस्थापन कार्यक्रम हाती घेण्यात आला असून पुणे रेल्वे स्थानकाचा यात समावेश आहे. यासाठी खाजगी संस्थांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. पुण्यासह चंदिगड, आनंदविहार (दिल्ली), सिकंदराबाद, बेंगळुरू रेल्वे स्थानकांचाही या कार्यक्रमात समावेश आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@