नोेकरीच्या आमिषाने ३०० बेरोजगारांना ७ कोटीचा गंडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Feb-2018
Total Views |
 

 
नोेकरीच्या आमिषाने ३०० बेरोजगारांना ७ कोटीचा गंडा
लष्करातील सुभेदारासह पत्नी व मुलास अटक 
पाचोरा, २५ फेब्रुवारी
नोेकरीचे आमिष दाखवून सुमारे ३०० बेरोजगारांना ७ कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी लष्करातील सुभेदार  हस्नोद्दीन चांदभाई शेख,त्याचा मुलगा वजीर हस्नोद्दीन शेख व त्याची पत्नी रेश्मा या तिघांना अटक करण्यात पाचोरा पोलिसांना यश आले आहे.
 
 याची झाली फसवणूक - धनराज थोटे (रा.वाकडी ता.जामनेर) ६ लाख, गोपाळ विठ्ठल पाटील(रा.गोरदखेडा ता.पाचोरा)४.६०लाख, धनसिंग गुमानसिंग पाटील (कन्हेरे ता.पारोळा) ५.५ लाख, तुकाराम सखाराम बारी (रा.पहूर ता.जामनेर)३.५लाख, शाळीग्राम श्रावण बारी (रा.शेंदुर्णी)४.५ लाख,विनोद तुकाराम वाघ (रा.जांभोल ता.जामनेर) ३लाख, पंकज अरुण चौधरी (रा.शेंदुर्णी)३लाख, हसन भिकन अतार (रा.चाळीसगाव)१६० लोकांचे १कोटी६०लाख, सुनील बाबुराव पाटील (रा.वरखेड ता.भडगाव)५लाख, तुलसीदास भानुदास पाटील.
 
 
५५ लोकांचे २ कोटी ३८ लाख,४० हजार, रोहिदास शनकर असकर (रा.शेरी ता.जामनेर) ४लाख, प्रदीप जयसिंग पाटील (वरखेड ता.भडगाव) ५.५लाख, अशोक चंद्रसिंग पाटील (रा.वरखेड)३ लोकांचे १५लाख, तुलसीदास दामोदर सूर्यवंशी (रा.कळवण) २० लाख, प्रकाश भीमसिंग पाटील (रा.आमडदे ता.अमळनेर) ४ लाख,सुभाष हिराचंद पाटील ५ लाख,सुभाष बन्सीराम पाटील ७ लाख, जयसिंग नरसिंग पाटील ६ लाख,शांताराम चबेसिंग पलोड (रा.नंदुरबार) ६लाख, सापडू झिपरू (रा.जोगलखेडा ता.पारोळा) ५लाख आदी लोकांची फसवणूक झाल्याची माहिती   दिली.
फसवणूक झालेले लोक पैसे मागण्यासाठी अहमदनगर येथे त्यांच्याकडे गेले असता आरोपी बंदुकीचा धाक दाखवून मारठोक करण्याची धमकी देत असल्याची माहिती लोकांनी दिली. तसेच पाहण येथील प्रभाकर म्हासिंग पाटील याने १ कोटी ७४ लाख ५० हजार रुपये भरले होते. त्यानंतर आत्महत्त्या केल्याबाबत लोकांनी माहिती दिली. आरोपीने २० लाख रुपये खर्च करून खुशबू नामक मुलीस फिलिपाईन्स अमेरिकेला पाठविल्याची माहिती पोलीस निरीक्षक सोमवंशी यांनी दिली.
आरोपी हस्नोद्दीन चांद शेख याने पुण्यातील ओरा व नाईक माने यांनाही फसविल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच आरोपीने बनावट सहीशिक्क्यांचा वापर करून बनावट ऑर्डरी दिल्याची माहितीही समोर आली आहे. त्याने २०१३ पासून हा गोरखधंदा सुरू केला आहे. फार मोठे रॅकेट उघड होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली.आरोपीचे अहमदनगर येथे त्याच्यासह भावाचे मिळून तीन मोठे बंगले तसेच मोठा फार्म हाऊस असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे,पोलीस हेड.कॉ. हंसराज मोरे, अमृत पाटील, राहुल सोनवणे विजय पाटील महिला पोलीस शारदा भावसार, प्रदीप चांदेलकर सह सर्व पोलीस कर्मचार्‍यांचे यात सहकार्य मोलाचे आहे.
 
अशी करायचा फसवणूक
या घटनेबाबत सचिन धनराज शिरसाठ(२७, रा.भास्करनगर ,पाचोरा ) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की मी नोकरीच्या शोधात असताना शेख हस्नोद्दीन शेख चांद (रा.हनुमान नगर, वाळकी रोड, अहमदनगर याच्याशी चाळीसगाव येथील हसन भिकन अतार (रा.घाट रोड)याच्या मार्फत तीन वर्षांपूर्वी भेट झाली होती. त्या वेळेस शेख हस्नोद्दीन शेख चांद याने सांगितले की माझी सरकारी अधिकार्‍यांच्याशी ओळख आहे, त्यांच्या मदतीने मी तुला सरकारी नोकरीमध्ये क्लर्क म्हणून नोकरी लावून देऊ शकतो, मी यापूर्वी अनेकांना नोकर्‍या लावून दिलेल्या आहेत, असे त्याने सांगितले. म्हणून फिर्यादीने त्याच्यावर व मध्यस्थ हसन भिकन अतार यावर विश्वास ठेवून त्यास किती पैसे द्यावे लागतील याबाबत विचारपूस केली असता त्यांनी १५ते२०लाख रुपये खर्च येईल असे सांगितल्याने फिर्यादीने प्रथम तीन वर्षांपूर्वी तीन लाख आणि त्यानंतर वेळोवेळी मिळून १२ लाख रूपये दिले. मात्र नोकरी न लागल्याने पैसे परत करतो असे सांगून दिलेला धनादेशही वटला नाही. अशाचप्रकारे अनेकांना फसविण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@