पाच वर्षांखालील मुलांना मिळणार आता बालआधार कार्ड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Feb-2018
Total Views |
 
 

 
 
 
 
बँक खाते, आर्थिक व्यवहार तसेच इतर कुठलेही महत्वाचे काम करायचे असेल तर आजकाल आधार कार्ड आवश्यक झाले आहे. म्हणून यासाठी पाच वर्षांखालील मुलामुलींसाठी आता सरकारने बालआधार कार्ड काढण्याचा निर्णय घेतला आहे. निळ्या रंगाचे हे बाल आधार कार्ड पाच वर्षापर्यंत चालणार असून पाच वर्षांनंतर नंतर पालक मुलांचे अधिकृतरीत्या आधार कार्ड काढण्यास नोंदणी करू शकतात.
 
 
 
 
पाच वर्षांखालील मुलांचे बाल आधार कार्ड काढल्यावर पाच वर्षांनंतर मुलांची बायोमॅट्रीक माहिती अद्ययावत करणे गरजेचे आहे. यामध्ये मुलांचे हात, बोट आणि चेहरा यांची माहिती घेतली जाईल. कुठलेही व्यवहार करायचे असेल तर आधार कार्ड अनिवार्य झाले असल्याने पाच वर्षांखालील मुलांचे देखील बाल आधार कार्ड काढावे अशी माहिती सरकारने जाहीर केली आहे.
 
 
 
 
त्यामुळे आता सरकारने पाच वर्षांखालील मुलांसाठी निळ्या रंगाचे आकर्षक बाल आधार काढण्याचा निर्णय घेतला आहे. बाल आधार कार्ड काढण्यासाठी मुलांचे शाळेचे ओळखपत्र चालणार असून यामध्ये मुलांची प्राथमिक माहिती नोंदविली जाणार आहे. आपल्या घराजवळच्या आधार केंद्रात हे कार्ड प्रत्येक पालकांना काढता येणार आहे. 
@@AUTHORINFO_V1@@