जळगाव रेल्वे स्थानकावरून 2 तोळे सोने लंपास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Feb-2018
Total Views |
 
जळगाव रेल्वे स्थानकावरून 2 तोळे सोने लंपास 


जळगाव, 26 फेब्राुवारी
नातेवाईकांच्या साखरपुडयास जळगाव येथून ब­हाणपूर येथे रेल्वेने जात असलेल्या महिलेची बॅग उघडून 2 तोळे सोने चोरीस गेल्याची घटना सोमवाररोजी दुपारी घडली.
बीपीन मराठे यांच्या बहिणीकडे साखरपुडा असल्याने 5 ते 6 महिला 26 रोजी काशी एक्सप्रेसने ब­हाणपूरला साखरपुडयासाठी जात होते. जातांना दोन पोत प्रत्येकी एक तोळा सोन्याच्या या लाल डबीत ठेवून बॅगेत ठेवल्या होत्या. दुपारी फलाट क्र. 3 वर गाडी आली असता मुले आणि सोबतच्या महिला गाडीत बसल्या. बीपीन यांच्या पत्नी पल्लवी मराठे गाडीत चढत असतांना त्यांना त्यांच्या हातातील बॅगला झटका बसल्याचे त्यंाना जाणवले स्थानकावरील पोलीसांना त्यांनी आवाज दिला. तो पर्यंत गाडी सुरू झालेली होती. बॅगची चैन उघडी असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी बॅग उघडून पाहिली असता त्यातुन सोन्याच्या दोन्ही पोत लंपास झालेल्या होत्या . पल्लवी या ब­हाणपूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्या असता. हा विषय जळगाव स्थानकावरील आहे. तुम्ही तेथेच तक्रार नोंदवा असे सुचविले. वास्तविक शुन्य क्रमांकाने तक्रार नोंदवून ती वर्ग करता येते. परंतु तेथील पोलीसांनी जबाबदारी झटकली. यामुळे बिपीन मराठे हे जळगाव स्थानकावर आले असता तक्रार दाखल करण्याची कारवाई उशिरा पर्यंत सुरू होती.
जळगाव रेल्वेस्थानकावरील कॅमेरे कुचकामी ?
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. परंतु हे कॅमेरे केवळ फलाटावरील शेडच्या आतच आहे. शेडच्या बाहेर कॅमेरे नाहीत. पल्लवी मराठे यांचे सोने जेथून चोरीस गेले ती जागा शेडच्या बाहेर असल्याने सीसीटीव्ही फुटेज मिळणे अवघड आहे.
@@AUTHORINFO_V1@@