कोहली आणि धोनीला विश्रांती - श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहिर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Feb-2018
Total Views |


 
नवी दिल्ली : श्रीलंकेमध्ये होणाऱ्या निद्हास चषक २०१८ साठी केंद्रीय निवड समितीने आज भारतीय संघाची घोषणा केली आहे. या टी-२० मालिकेसाठी रोहित शर्मा याच्याकडे कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, शिखर धवन हा उप कर्णधारपद सांभाळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

६ मार्च ते १८ मार्च या दरम्यान भारत, श्रीलंका आणि बांगलादेश या तीन देशांमध्ये ही मालिका आहे. ६ मार्चला या मालिकेतील पहिला सामना कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियम येथे खेळला जाणार आहे.


या दौऱ्यामधून विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांना विश्रांती देण्यात आली असून अनेक नव्या चेहऱ्यांना संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांनाही संघातून वगळण्यात आले आहे.


दक्षिण आफ्रिकेबरोबरच्या कालच्या टी-२० सामन्यात दुखापतीमुळे विराट कोहली खेळू शकला नव्हता. त्यामुळे तात्पुरते कर्णधारपद हे रोहित शर्माकडे देण्यात आले होते.


तिहेरी मालिकेसाठी संघ खालीलप्रमाणे -

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उप-कर्णधार), के.एल. राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक ( यष्टिरक्षक), दीपक हुडा, वॉशिंगटन सुंदर, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दुल ठाकूर, जयदेव उनादकत, मोहम्मद सिराज, ऋषभ पंत

@@AUTHORINFO_V1@@