अरूणा रेड्डी हिला जिम्नॅस्टिक वर्ल्ड कपमध्ये कांस्य पदक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Feb-2018
Total Views |




मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) : भारताच्या अरूणा रेड्डी हिने जिम्नॅस्टिक वर्ल्ड कपमध्ये कांस्य पदत पटकावले आहे. २२ वर्षीय अरूणा हिने हिसेन्से एरिनामध्ये १३.६४९ अशा गुणांनी कांस्य पदकावर आपले नाव कोरले आहे. स्लोवानिया आणि ऑस्ट्रेलियाच्या स्पर्धकांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रजत पदक मिळवले आहे.



ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये जिम्नॅस्टिक या खेळाच्या विश्वचषक स्पर्धा खेळण्यात येत होत्या. त्यात भारताला हे पदक मिळाले आहे.


आशिष कुमार (२०१०) आणि दिपा कर्माकर (२०१४) यांच्यानंतर अरूणा रेड्डी तिसरी जिम्नॅस्ट ठरली आहे जिने इंटरनॅशनल जिम्नॅस्टिक फेडरेशन अंतर्गत पदक पटकावले आहे.


अरूणा रेड्डी ही वर्ल्डकपध्ये पदक मिळवणारी पहिली भारतातील महिला आहे. यास्पर्धेनंतंर अरूणा ही यावर्षी होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये ही सहभागी होणार आहे.

जिम्नॅस्टिक वर्ल्ड कपमध्ये पदक मिळवून देणाऱ्या अरूणाचे सर्व स्तरातून कौतुक होते आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही ट्वीटरवरून तिचे अभिनंदन केले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@