उधना – जळगाव रेल्वे मार्गावरील 2 गाडया रद्द15 गाडयांच्या मार्गात बदल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Feb-2018
Total Views |
 
उधना – जळगाव रेल्वे मार्गावरील 2 गाडया रद्द
15 गाडयांच्या मार्गात बदल
भुसावळ, 24 फेब्राुवारी
उधना – जळगाव रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण होत असून या अंतर्गत उधना येथे दुहेरी करणाचे काम होत असल्याने 25 ते 27 फेब्राुवारी दरम्यान या मार्गावर धावणरी 2 रेल्वे गाडी रद्द करण्यात आली आहे तर 15 गाडयांचे मार्ग बदलविण्यात आले आहेत. तर काही गाडयाचे मार्ग त्यांच्या निर्धारित स्थानकांपुर्वी थांबविण्यात आले आहेत.
 
 
गाडी क्र. 1925 सुरत- अमरावती एक्सप्रेस ही 25 रोजी तर गाडी क्र.19026 अमरावती -सुरत एक्सप्रेस ही गाडी 26 रोजी रद्द करण्यात आली आहे. तर गाडी क्र. 12655 अहमदाबाद-चैन्नई आणि 22138 अहमदाबाद-नागपूर ही 25 रोजी सुरत, वसईरोड, इगतपुरी मार्गे धावेल. 17624 बिकानेर-नांदेड ही गाडी 24 रोजी सुरत, वसईरोड, इगतपुरी मार्गे धावेल. 22937 राजकोट -रेवा आणि 17038 बिकानेर –सिकंदराबाद25 रोजी सुरत, वसईरोड, जळगाव मार्गे ,12656 चेन्नई - अहमदाबाद आणि 22663 चैन्नई –जोधपूर एक्सप्रेस 24 रोजी जळगाव, वसई, सुरत मार्गे, 26 रोजी गाडी क्र. 12833 अहमदाबाद- हावडा एक्सप्रेस आणि 12655 अहमदाबाद –चैन्नई एक्सप्रेस सुरत , वसई, जळगाव मार्गे धावणार आहे. 26 रोजी 12843 अहमदाबाद –पुरी ही गाडी सुरत, वसई, जळगाव मार्गे धावेल. 24 रोजी 12843 पुरी -अहमदाबाद, 12834 हावडा-अहमदाबाद, 12906 हावडा-पोरबंदर या गाडी जळगाव, वसई, सुरत मार्गे धावणार. 25 रोजी 12656 चेन्नई - अहमदाबाद ही गाडी जळगाव, वसई, सुरतमार्गे धावणार आहे.
 
 
तर गाडी क्र. 15563 जयनगर-उधना ही गाडी 24 रोजी जयनगर ते गंगाधरा, 59014 भुसावळ -सुरत पॅसेंजर 23 ते 25 फेब्राुवारी दरम्यान भुसावळ ते बारडोली दरम्यान धावणार. 59076 भुसावळ-सुरत पॅसेंजर 25 ते 26 फेब्राुवारी भुसावळ ते बारडोली दरम्यान धावणार. 15564 उधना- जयनगर 25 रोजी गंगाधरा ते जयनगर धावणार. 159075 सुरत-भुसावळ पॅसेंजर 25 व 26 रोजी बारडोली-भुसावळ दरम्यान, 59013 सुरत-भुसावळ पॅसेंजर 24 ते 26 फेब्राुवारी दरम्यान बारडोली ते भुसावळ स्थानका दरम्यान धावणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@