६२ हजार ८७९ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा१ मार्चपासून परीक्षेला होणार प्रारंभ, जिल्ह्यात १३१ परीक्षा केंद्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Feb-2018
Total Views |

६२ हजार ८७९ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा
१ मार्चपासून परीक्षेला होणार प्रारंभ, जिल्ह्यात १३१ परीक्षा केंद्र

 
 
 
जळगाव, २४ फेब्रुवारी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून १ मार्चपासून इयत्ता दहावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १३१ परीक्षा केंद्रांवर ६२ हजार ८७९ विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
१ मार्च रोजी मराठी विषयाचा पहिला पेपर घेण्यात येणार आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार होण्याचा गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता परीक्षा केंद्रांवर बंदोबस्त वाढविण्यासोबतच जास्तीत जास्त भरारी पथकांची स्थापना करण्यावर शिक्षण विभाग व जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे. परीक्षेआधी मोबाईल व इतर माध्यमांद्वारे प्रश्नपत्रिका बाहेर येण्याचे गैरप्रकार वाढत असल्याने शिक्षकांचे मोबाईल परीक्षेआधीच जमा केले जाणार असून, उपद्रवी केंद्रांवर तगडा बंदोबस्त लावण्यात येणार आहे.
जिल्ह्यात ५ उपद्रवी केंद्र
जिल्ह्यात एकूण ५ उपद्रवी केंद्र घोषित करण्यात आले आहेत. महसूल प्रशासनाकडे देखील कॉपी मुक्त परीक्षा अभियानाची जबाबदारी देण्यात आली आहे. सर्व तालुक्यातील तहसीलदारांचे स्वतंत्र भरारी पथक देखील स्थापन करण्यात येणार आहे. सोमवारी (दि. २५) रोजी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या उपस्थितीत शिक्षण विभाग व महसूल विभागातील अधिकार्‍यांसोबत बैैठक होणार आहेत. या बैठकीत परीक्षेबाबत आवश्यक उपाययोजना करण्याचा सूचना दिल्या जाणार आहेत, असेही शिक्षण विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
केंद्र संचालकांना सूचना
जिल्ह्यातील १३१ परीक्षा केंद्राच्या केंद्र संचालक, उपकेंद्र संचालक, दालन पर्यवेक्षकांची सहविचार सभा शुक्रवारी (दि. २३) शहरातील ला.ना. सार्वजनिक विद्यालयात घेण्यात आली. या सभेत नाशिक विभागीय मंडळाचे सहसचिव एम.व्ही.कदम यांनी तणाव व कॉपीमुक्ती परीक्षा घेण्यावर भर देण्याबाबत सूचना दिल्या. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी पठाण, हेमंत पगारे, मिलिंद चव्हाण, एस.एन. मानकोस्कर आदी उपस्थित होते.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@