न्यायालयाची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी वकिलांनी न्याय्य भूमिका पार पाडावी-मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक यांचे प्रतिपादन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Feb-2018
Total Views |

न्यायालयाची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी वकिलांनी न्याय्य भूमिका पार पाडावी
-मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक यांचे प्रतिपादन

 
जळगाव, २४ फेब्रुवारी
भावी वकिलांसाठी खूप संधी उपलब्ध आहेत. वकिलांनी त्या संधी प्राप्त केल्या पाहिजेत. त्यासाठी कठीण परिश्रम व शिस्तीची आवश्यकता आहे. न्यायालयाची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी वकिलांनी मूल्यात्मक न्याय्य भूमिका पार पाडावी, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक यांनी केले.
 
एस.एस. मणियार विधी महाविद्यालयात आयोजित डॉ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे स्मृती १३ व्या राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी न्यायमूर्ती कर्णिक यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या समारंभास जळगावचे प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सी.आर. हंकारे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.डॉ.पी.पी. माहुलीकर, सौ. कर्णिक यांची विशेष उपस्थिती होती. त्याप्रमाणे के.सी.ई. सोसायटीचे सचिव ऍड.एस.एस. फालक, के.सी.ई. सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य ऍड. सुनील चौधरी, प्राचार्य डॉ.बी. युवाकुमार रेड्डी, मूट कोर्ट सोसायटी समन्वयक डॉ. विजेता सिंग उपस्थित होते. अध्यक्षस्थानी के.सी.ई. सोसायटीचे उपाध्यक्ष ऍड. प्रकाश पाटील होते.
या कार्यक्रमप्रसंगी जिल्हा न्यायालयीन अधिकारी के.एच. ठोंबरे, कुलकर्णी, दरेकर, गिरडकर, थोरात, वाणी, प्रतिभा पाटील, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे सोनावणे, अतुल आळसी, जळगाव जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड.आर.आर. महाजन, ऍड. प्रमोद पाटील, ऍड. आनंद मुजुमदार, ऍड. सत्यजित पाटील, ऍड. सौरभ मुंदडा, ऍड. अतुल सूर्यवंशी, ऍड. हेमंत भंगाळे, प्रा.डी.आर. क्षीरसागर, प्रा. रेखा पाहुजा, प्रा.जी.व्ही. धुमाळे, प्रा. योगेश महाजन, प्रा. अंजली बोंदर, प्रा. ज्योती भोळे, प्रा. मारथी उपस्थित होते.
न्यायमूर्ती कर्णिक पुढे म्हणाले विधी शिक्षणाचा दर्जा उंचावला आहे. अभिरूप न्यायालयही त्याचाच एक भाग आहे. तेव्हा या स्पर्धेतील सहभाग हाच विजय असल्याचे त्यांनी सांगितले. न्यायाधीश सी.आर. हंकारे यांनी सांगितले की, देशहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. त्यात वकिलांची भूमिका महत्त्वाची आहे, असे त्या म्हणाल्या. यावेळी डॉ.पी.पी. माहुलीकर, ऍड. प्रकाश पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. रेड्डी यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर महाविद्यालयाच्या सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन ऋतुजा लाठी व मिताली वाणी यांनी केले. प्रा.डी.आर. क्षीरसागर यांनी आभार मानले.
 
@@AUTHORINFO_V1@@