ट्रक रिक्षा अपघातात जि.प.शाळेच्या शिक्षीका ठार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Feb-2018
Total Views |
 
ट्रक रिक्षा अपघातात जि.प.शाळेच्या शिक्षीका ठार
 
 
जळगाव, 24 फेब्राुवारी
शहरातील महामार्गावर ट्रकचालकाला मिरगीचा झटका येवून त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले.यामुळे ट्रकने दोन रिक्षांना धडक दिली.यातील जि.प.शाळेच्या शिक्षीका सीमा नितीन कोष्टी यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवार 24 रोजी घडली.
अपघातातील मयत सीमा कोष्टी या जामनेर तालुक्यातील सुनसगाव येथील जि.प.शाळेच्या शिक्षका होत्या. त्यांचे पती नितीन कोष्टी हे ला.ना.सार्वजनिक विद्यालयात शिक्षक आहेत.कोष्टी दांम्पत्याचे वास्तव्य आदर्श नगर येथे आहे. शनिवार रोजी सीमा कोष्टी यांची शाळा लवकर सुटल्याने अजिंठा चौफुलीयेथून रिक्षा क्र.एमएच 19 व्ही 5141 ने त्या आदर्शनगर येथे जाण्यासाठी बसल्या.या रिक्षाच्या मागुन येणार ट्रक क्रं. सीजी 4 जेडी 6951 च्या चालकाला मिरगी आली आणि त्याचा वाहनावरील नियंत्रण सुटले त्यामुळे त्याच्या पुढे चालणा­या रिक्षा क्र. एमएच 19 व्ही 5141 व रिक्षा क्र. एमएच 19 व्ही 7227 , एक चारचाकी वाहन आणि एका दुचाकिला धडक दिली. या अपघाता रिक्षा रस्त्याच्या कडेला जावून उलटली. रिक्षा चालक रामदास शिवाजी भोसले,अख्तर शेख हुसेन उमर पिंजारी, शेख हमीद शेख बशीर, दत्तात्रय नारायण फुसे, जि.प.शिक्षीका सीमा कोष्टी हे जखमी झाले.जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु सीमा कोष्टी यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
नितीन कोष्टी हे नियमित सीमा यांना सोडायला आणि घ्यायला जात असत. परंतु शनिवारी ला.ना.विद्यालयात कार्यक्रम असल्याने जावू शकले नाही. आणि काळाने सीमा कोष्टीवर झडप घातली.सीमा कोष्टी यांच्या अपघाती मृत्यूची माहिती मिळाल्या नंतर त्यांच्या नातेवाईकांनी तसेच सुनसगावच्या शाळेतील शिक्षकांनी जिल्हा रुग्णालय गाठले.मयत सीमा यांच्या पश्चात पती नितीन, सासु,सासरे, देवेश व मानस अशी दोन मुले आहेत.ट्रक चालकास ट्रकसह ताब्यात घेण्यात आले असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@