डिजिटल अर्थव्यवस्थेत रोजगाराच्या अमाप संधी-मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
 
नागपूर येथे युवा सक्षमीकरण परिषदेचे आयोजन


नागपूर : गरज ही शोधाची जननी आहे. स्टार्टअप संदर्भात राज्याचे नवीन धोरण तयार करण्यात आले आहे. या अनुषंगाने येत्या पाच वर्षात मटेरियल अर्थव्यवस्थेपक्षा डिजिटल अर्थव्यवस्थेला जास्त महत्त्व असून यामध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. नागपूरसह राज्यातील बारा जिल्ह्यात स्टार्टअप इको सिस्टीम सुरु करण्यात येत असून यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
 
 
 
 
 
मिहान येथे संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रातील डिफेन्स पार्क तयार होत असून कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी टाटासोबत तीनशे कोटी रुपये गुंतवणुकीचा संरक्षण क्षेत्रातील कौशल्य विकास पार्क सुरु करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. डॉ.वसंतराव देशपांडे सभागृह येथे फार्च्युन फाऊंडेशन, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वतीने युथ एम्पॉवरमेंट समिटचे (युवा सक्षमीकरण परिषद) आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवकांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
 
 
 
 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, युवक वर्गातून रोजगार व स्वयंरोजगाराची मोठ्या प्रमाणात मागणी होत असते. तर दुसरीकडे उद्योग क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर बेरोजगार युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेले युथ एम्पॉवरमेंट समिट हा एक स्त्युत्य उपक्रम आहे. उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होण्यासाठी मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. राज्यात होणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीमध्ये वाढ होत असून महाराष्ट्र आता यामध्ये अग्रेसर आहे. देशात होणाऱ्या एकूण गुंतवणुकीपैकी निम्मी गुंतवणूक महाराष्ट्रात होत आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या माध्यमातून १६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात झाली आहे. या माध्यमातून ३५ लाख रोजगार संधी निर्माण होणार आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@