रत्नागिरीमध्ये एलईडी लाईटद्वारे मासेमारी करणाऱ्या ९ बोटी जप्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
मुंबई : एलईडी लाईटच्या सहाय्याने होणाऱ्या मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडून स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकाने रत्नागिरी व जयगडच्या परिसरात केलेल्या कारवाईत एलईडी लाईट साधनसामुग्री आढळून आलेल्या ९  आणि बेकायदेशीरपणे पर्ससीन जाळ्याद्वारे मासेमारी करणाऱ्या २  अशा ११  बोटी जप्त करण्यात आल्याची माहिती विभागाने दिली आहे.
 
एलईडी लाईटद्वारे करण्यात येणारी मासेमारी ही मत्स्यसाठ्यावर अत्यंत घातक परिणाम करणारी आहे. केंद्र शासनाच्या १०  नोव्हेंबर २०१७  च्या आदेशानुसार एलईडी लाईटद्वारे मासेमारी करण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. एलईडी लाईटच्या प्रकाशामुळे मासेमारी क्षेत्रातील सर्व मासे आकर्षित होऊन एकाच ठिकाणी जमा होतात. हा संपूर्ण साठा एकाच जाळ्याद्वारे पकडला जातो. त्यामुळे असे साठे संपत गेल्यास भविष्यात माशांचे उत्पादन कमी होऊन मत्स्यदुष्काळाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे एलईडी लाईटद्वारे होणाऱ्या मासेमारीला प्रतिबंध घालण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडून गस्त घालण्यात येत आहे.
 
 
रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गस्तीदरम्यान आढळून येणाऱ्या अवैध मासेमारीबाबत कारवाई करण्यासाठी तटरक्षक दल (कोस्ट गार्ड) आणि पोलिसांना मत्स्यव्यवसाय विभागाला सहकार्य करण्याचे निर्देश दिले होते. रत्नागिरीचे मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्त आ. बा. साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील परवाना अधिकाऱ्यांच्या पथकाच्या गस्तीदरम्यान अवैधरित्या मासेमारी होत असल्याचे आढळून आल्याने कारवाई करण्यात आली.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@