मुक्ताईनगरसाठी ५० कोटींचा निधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Feb-2018
Total Views |
 
 
मुक्ताईनगरसाठी ५० कोटींचा निधी
मुक्ताईनगर, २३ फेब्रुवारी
नव्याने अस्तित्वात आलेल्या मुक्ताईनगर नगरपंचायतीस नागरी सुविधा, प्रशासकीय इमारत, सांस्कृतिक नाट्यगृह, शहरातील प्रत्येक रस्त्याचे कॉंक्रिटीकरण ही कामे येत्या दोन वर्षात पूर्ण होणार आहेत.
 
 
 
या कामांसाठी ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास मुख्यमंत्र्यांनी अनुकूलता दर्शविली आहे. पहिल्या टप्प्यात आवश्यक साडेदहा कोटी रुपयांपैकी साडेपाच कोटी रुपये आजच उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी सांगितले.
नव्याने अस्तित्वात आलेल्या नगरपंचायत कर्मचारी आकृतीबंध व शहराचे रुपडे पालटविण्यास प्रत्येक रस्ता कॉंक्रिटचा होण्यास २० किमी अंतराचे शहरातील अंतर्गत रस्ते ट्रीमिक्स पद्धतीने कॉंक्रिटीकरणासाठी ७ कोटी, आदिवासी व दलित वस्ती विकासासाठी २ कोटी, विद्युतीकरण व हायमास्ट एलईडी, नवीन गटारी अल्पसंख्याक वस्ती विकासासाठी मागील ७० लाख अनुदानात ३० लाख रुपयांच्या कामांची वाढ, नागरी सुविधा संस्कृती व नाट्य चळवळ विकास, नगरपंचायत प्रशासकीय इमारत, अग्निशमन व्यवस्था या कामांसाठी ५० कोटी रुपये खर्चाचा दोन वर्षांचा नियोजित कृती आराखडा तयार करून गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत माजी मंत्री आ. खडसे यांची बैठक झाली. या बैठकीत ५० कोटी निधी उपलब्ध करून देण्यास मुख्यमंत्र्यांनी अनुकूलता दर्शवली आहे. नियोजित कामांसाठी पहिल्या टप्प्यात १० कोटी रुपयांची नागरी सुविधा पुरविण्यास साहाय्य योजने अंतर्गत १० कोटीच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यात ५ कोटी तत्काळ मंजूर झाले असून उर्वरित ५ कोटींच्या विकास कामांची निविदा काढण्यास अनुमती देण्यात आली आहे. तसेच नगरपंचायतीना रस्ताअनुदान योजनेत रस्ता दुरुस्तीसाठी २० लाख व नागरी सुविधा पुरविण्यासाठी २५ लाख, असे एकूण ५ कोटी ४५ लाख रुपये तात्काळ मंजूर करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त ५ कोटी रुपयांच्या नागरी कामांच्या निविदा काढल्या जाणार आहेत. मुक्ताईनगर पाठोपाठ बोदवड नागरपंचयतीस देखील नागरी सुविधा पुरविण्यास सहाय्य योजनेतून २५ लाख व रस्ते अनुदानातून २० लाख मंजूर करण्यात आल्याचे आ. खडसे यांनी सांगितले. नगरपंचायत निमित्ताने दूरदृष्टीने ५० कोटींच्या कृती आराखड्यातील कामे आकारास येण्यास स्वतः आ. एकनाथराव खडसे यांनी लक्ष घातल्याचे दिसून आले. यावेळी खा. रक्षाताई खडसे, जिल्हा बँक चेअरमन रोहिणीताई खडसे, योगेश कोलते, पांडुरंग नाफडे, राजू माळी आदी उपस्थित होते
 
 
मुक्ताईनगर पंचायतीची आरक्षण सोडत २६ ला
मुक्ताईनगर ग्रामपंचायतीचे ४ डिसेंबर २०१७ ला नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर येणार्‍या कालावधीत नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याने मुक्ताईनगर नगरपंचायतीची आरक्षण सोडत २६ रोजी, सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात काढण्यात येईल. सोडतीमध्ये अनुसूचित जातीमधील महिला, अनु. जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला, तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला सोडत निघेल. यासंदर्भात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांचे आदेश प्राप्त झाले आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@