सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली नीट परिक्षार्थींची याचिका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
दिल्ली : राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा अर्थांत ‘नीट’ २०१८ ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. काही वैद्यकीय उमेदवारांनी 'सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन'च्या (सीबीएसई) नीट परिक्षा २०१८ च्या सामान्य श्रेणीतील विद्यार्थ्यांची २५ वयोमर्यादा निश्चित करण्याच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले होते, मात्र  सर्वोच्च न्यायालयाने आता ही याचिका फेटाळली आहे. 
 
 
सीबीएसईने ९ फेब्रुवारी रोजी नीट परिक्षेसंदर्भातील प्रवेशाची अधिसूचना जाहीर केली होती. नीट परिक्षा २०१७ पेक्षा नीट परिक्षा २०१८ मधील पात्रता निकषांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार नीट २०१८ च्या परिक्षेसाठी कमीत कमी १७ वर्षे वयोमर्यादा ठेवण्यात आली असून १७ वर्षे वय पूर्ण किंवा ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत १७ वर्षे वय पूर्ण होत असेल, तेच विद्यार्थी ही परिक्षा देण्यासाठी पात्र ठरणार आहेत. 
 
 
 
तसेच एस.सी., एस.टी. किंवा अन्य काही मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या श्रेणी आणि अपंगत्व कायद्यानुसार या विद्यार्थ्यांसाठी ५ वर्षांच्या विश्रांतीसह सर्वसाधारण गटात २५ वर्षांपेक्षा जास्त वयोमर्यादा लागू केली आहे, म्हणजेच ६ मे २०१८ पर्यंत २५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाचे विद्यार्थी या परिक्षेसाठी पात्र असणार आहेत.  
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@