चेतेश्वर पुजारा याला कन्यारत्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
 
क्रिकेटर चेतेश्वर पुजारा याला आज कन्यारत्न प्राप्त झाले आहे. ही गोड बातमी चेतेश्वर पुजारा याने स्वत:च्या ट्वीटर अकाऊंटवरून दिली आहे. त्यामुळे आता चेतेश्वर पुजारा एका छान गोंडस मुलीचा बाप बनला आहे. पूजा आणि माझ्या जीवनात एका छोट्या मुलीचे आगमन झाले आहे अशा शब्दांमध्ये त्याने ही माहिती दिली आहे.
 
 
 
३१ डिसेंबर २०१७ ला चेतेश्वर पुजारा याने एक ट्वीट करत आम्ही लवकरच सगळ्यांना गोड बातमी देणार असल्याची घोषणा केली होती. हे वर्ष पूजा आणि माझ्यासाठी आनंदाचा पिटारा घेवून येणारे असणार आहे असे ट्वीट करत ही बातमी चेतेश्वर याने त्याच्या चाहत्यांना दिली होती. 
@@AUTHORINFO_V1@@