विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भावनांचे व्यवस्थापनावर मार्गदर्शन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Feb-2018
Total Views |
विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये तज्ज्ञ वक्त्यांकडून विपश्यनेचे महत्त्व, भावनांचे व्यवस्थापनावर मार्गदर्शन
 
 
 
​विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विपश्यनेचे महत्त्व आणि भावनांचे व्यवस्थापन या विषयावर नुकतेच विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
विजय कांबळे, उद्देश अडकमोल, संजय यादव यांनी विपश्यनेचे महत्त्व या विषयावर सातवीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आनापनचे महत्त्व, त्याचा अर्थ, विपश्यनेपासून होणारे फायदे याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. डॉ. विवेक काटदरे यांनी ‘भावनांचे व्यवस्थापन’ या विषयावर इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भावनांचे प्रकार, व्यवस्थापन याची माहिती त्यांनी सांगितली.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील व समन्वयक गणेश लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन दिनेश महाले यांनी केले. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन पंकज कुलकर्णी यांनी पाहिले. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
 
@@AUTHORINFO_V1@@