बांधकाम कामगारांसाठी विशेष मोहीम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Feb-2018
Total Views |
 

बांधकाम कामगारांसाठी विशेष मोहीम


जळगाव, २२ फेब्रुवारी –

राज्यातील बांधकाम कामगारांसाठी राज्य शासनाने विशेष नोंदणी अभियान हाती घेतले असून त्यातंर्गत २३ फेब्रुवारी ते २३ मार्चपर्यंत बांधकाम कामगारांची नोंदणी केली जाणार आहे.

अदृश्य चेहऱ्यांना ओळख देऊन त्यांच्या उज्वल भविष्यासाठी राज्य शासनाने विशेष अभियान सुरु केले आहे. आपण आपल्या घरांचे, इमारतींचे, डौलदार बंगल्यांचे बांधकाम करतो परंतु त्या बांधकामांमध्ये अनेक हातांनी काम केलेले असते. आपण त्यांचे चेहरेही बघितलेले नसतात. घर मजबूत आणि सुंदर दिसण्यासाठी आपले प्राण पणाला लावून हे कामगार काम करत असतात. या बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र शासन कामगार कल्याणकारी मंडळाकडून ‘सन्मान कष्टाचा आनंद उद्याचा’ या अभियानांतर्गत या चेहऱ्यांना समाजात ओळख देण्याचा प्रयत्न करत आहे.

राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायती क्षेत्रात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवत नोंदणी झालेल्या कामगारांसाठी विविध २८ योजनांचा लाभ देऊन हीकल्याणकारी योजना तयार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सकाळी ११ : ३० वाजता www. mbocwwb.org या संकेत स्थळावरून थेट वेब प्रक्षेपण करण्यात येणार आहे. बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी विशेष मोहीम हाती घ्यावी, असे आदेश सर्व महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायतींना देण्यात आला आहे.

नोंदणी करण्याची सुलभ प्रक्रिया

१८ ते ६० वर्ष वयोगटातील कामगारांनी मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. फक्त २५ रुपये नोंदणी फी भरून दरमहा १ रुपयाप्रमाणे पाच वर्षांसाठी ६० रुपये एवढी अत्यल्प वर्गणी कामगारांना भरणे आवश्यक आहे. गेल्या वर्षभरात ९० किंवा त्याहून जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, पासपोर्ट आकाराची ३ छायाचित्रे, रहिवासी पुरावा, छायाचित्र ओळखपत्र, बँक पासबुकची सत्यप्रत या नोंदणीकरिता आवश्यक आहे.

इमारत व इतर बांधकाम (रोजगार,नियमन व सेवाशर्ती) अधिनियमातील मूळ व्याख्येत समाविष्ट २१ बांधकामावरील बांधकाम कामगारांनाही मंडळाकडे नोंदणी करून कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येईल. कामगारांना अपघात विमा संरक्षण, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती व अन्य सवलती अशा कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार आहे.

 
@@AUTHORINFO_V1@@