मुक्ताईनगरमध्ये महसूल आणि महावितरणमध्ये कुरघोडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Feb-2018
Total Views |

मुक्ताईनगरमध्ये महसूल आणि महावितरणमध्ये कुरघोडी
सामान्य नागरिक वेठीस

 
 
जळगाव, 22 फेब्राुवारी
राज्य शासनाच्या दोन विभागांमध्ये कुरघोडीचा प्रकार झाला की होणारी गंमत कशी असते हे मुक्ताईनगरवासीयांनी गुरूवार रोजी अनुभवले पण त्याचे परिणामही सामान्यांनाच भोगावे लागले. विजवितरण कंपनी आणि महसुलच्या विभागात हे नाटय रंगले.
महावितरण कंपनीने वसुलीचा सपाटा लावला आहे. त्या अंतर्गत मोठया थकबाकिदार असलेल्या शासकिय आस्थापनांचा विजपुरवठा खंडीत करण्यातची मोहिम सुरू केली आहे. बुधवाररोजी मुक्ताईननगर येथे थकबाकिपोटी तहसिल कार्यालयाचा विजपुरवठा खंडीत करण्यात आला. यामुळे तहसिल कार्यालयात अंधार झाला आणि सर्व कामकाज ठप्प झाले.याला तोड म्हणुन महसूल विभागाने  महावितरणची १० कार्यालये सील केली .
विजवितरण कंपनीने विजपुरवठा खंडीत केला म्हणून महावितरणकडे सुमारे 1 लाख रुपये पर्यंतचा थकित अकृषीक कराचा भरण्यामुळे तालुक्यातील 10 सबस्टेशन सिल करण्यात आले.यामुळे 82 गावांचा विजपुरवठा खंडीत झाला.
महसूल आणि महावितरण कंपनीच्या एकमेकांवरील कुरघोडयांमुळे तालुक्यातील नागरिक विनाकारण भरडले जात आहेत.शासकिय विभागच देयके भरण्यात पुढाकार घेत नसल्याने मोठे थकबाकिदार शासनाचीच खाती आहेत. मात्र वसुलीसाठी तगादा सामान्य नागरिकांडेच लावला जातो असा सुर उमटत आहे.
@@AUTHORINFO_V1@@