अपुर्ण मनुष्यबळ तरी देखील खाकी करतेय स्तुत्य कामगिरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Feb-2018
Total Views |
 
 
सुमारे पाच लाख लोकसंख्येच्या रक्षणार्थ जबाबदारी पार पाडतात केवळ पासष्ठ पोलीस कर्मचारी
अपुरे मनुष्यबळ तरी देखील खाकी करतेय स्तुत्य कामगिरी
एस आय मंजुर ११ उपलब्ध केवळ ५
एस सी एस मंजुर २३ उपलब्ध केवळ ११
एन पी सी १६ उपलब्ध १९
कॉन्स्टेबल ४६ उपलब्ध केवळ २७
 
अमळनेर -शहरासह तालुक्याच्या लोकसंख्येचा आढावा घेतला तर लोकसंख्या ही सुमारे चार ते पाच लाखांच्या जवळपास आहे. या लोकसंख्येच्या निकषावर तालुक्यातील पोलीस यंत्रणेतील पोलीस कर्मचारी यांची संख्या शंभराहून अधिक असली पाहिजे मात्र अमळनेर पोलीस ठाण्यात तपास केला असता मोजक्या पासष्ठ कर्मचार्‍यांच्या बळावर चार ते पाच लाख लोकसंख्येचा रक्षणार्थ आपले कर्तव्य अतिशय शिताफीने व जबाबदारीने चोख बंदोबस्तात पार पाडतात येथील अधिकारी व पोलीस कर्मचारी.
 
 
एकिकडे आपल्या कुटुंबासमवेत सण उत्सव साजरा करण्यात आपण रमलेलो असतांना या सणाला उत्सवाला कुठेही गालबोट लागु नये म्हणुन हे पोलीस कर्मचारी अतिशय काटेकोरपणे आपले कर्तव्य पार पाडत असतात. लोकांमध्ये पोलीस खात्याविषयी अतिशय संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळे आहे. याचा अभ्यास केला असता ते लक्षात येते.
 
 
अमळनेर तालुक्यातील ब्यान्नव खेडी व शहरासह सुमारे चार लाख लोकसंख्येच्या रक्षणाची जबाबदारी ही अमळनेर पोलिसांची आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांना शंभराहून अधिक कर्मचाऱ्यांची गरज आहे मात्र प्रत्यक्षात केवळ पासष्ठ कर्मचारी यांनी सोबत घेऊन या पोलीस स्टेशन चे अधिकारी अतिशय उत्तम कामगिरी करत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@