शेतकर्‍यांना प्रक्रिया उद्योगाकडे वळविण्याची गरज : महेश झगडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
नाशिक : ’’कृषि प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना नवी दिशा देताना त्यांना अन्नप्रक्रिया उद्योगाकडे वळविण्याची गरज आहे,’’ असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले.
 
महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब) येथे आयोजित नाशिक जिल्हा कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर, सीमा हिरे, नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, आत्माचे संचालक सुभाष खेमनर, कृषि सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम जगताप, आत्माचे प्रकल्प संचालक अशोक कांबळे आदी उपस्थित होते.
 
झगडे म्हणाले, ’’प्रक्रिया केलेले अन्न खाण्याकडे नागरिकांचा कल वाढतो आहे. ही चांगली संधी समजून शेतकर्‍यांनी शेतमालाचे उत्पादन घ्यावे आणि एकत्रित येऊन त्यावर प्रक्रिया करावी. देशात केवळ तीन टक्के शेतमालावर प्रक्रिया होत असून हे प्रमाण वाढविण्यासाठी कृषि विभागाला प्रयत्नपूर्वक शेतकर्‍यांची मानसिकता तयार करावी लागेल.’’ असे आवाहन त्यांनी केले.
 
यावेळी मान्यवरांच्या हस्ते उपविभागीय कृषि अधिकारी कैलास खैरनार यांनी लिहिलेल्या ‘किडनाशके-ओळख व हाताळणी’ या पुस्तकाचे आणि कृषि विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या शेतकर्‍यांच्या यशकथेवर आधारित पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते शेतीक्षेत्रात चांगली कामगिरी करणार्‍या शेतकरी गटांना आणि शेतकर्‍यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
 
पुरस्कार विजेते शेतकरी
 
संध्या बस्ते, झारवड ता. त्र्यंबकेश्वर, संतोष मुरलीधर देशमुख, पाळे ता. कळवण, गणेश लवाकुंश जाधव, हरणगाव ता. पेठ. आदर्श शेतकरी पुरस्कार- बबन कारभारी शिंदे, अस्तगांव ता. नांदगाव.
 
@@AUTHORINFO_V1@@