विविध योजनांच्या माध्यमातून शेतरस्त्यांना निधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Feb-2018
Total Views |



शेतरस्त्यांच्या कामांना आता गती येणार

मुंबई : विविध योजनांच्या माध्यमातून शेतरस्त्यांना निधी देण्यात येणार असून शेतरस्त्यांच्या कामांना आता गती मिळणार आहे. शेतीला लागणारी यंत्रसामग्री शेतापर्यंत नेता यावी आणि शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतमाल बाजारात पोहोचविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बारमाही शेतरस्त्यांच्या (पाणंद) कामांना गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.


माती, दगड व मुरूम टाकून कच्चे शेतरस्ते किंवा पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण करणे, तसेच पाणंद रस्ता अतिक्रमणमुक्त करून कच्चा रस्ता तयार करणे, तसेच पाणंद रस्ता अतिक्रमणमुक्त करून कच्चा व पक्का रस्ता एकत्रितपणे बांधणे या आदी बाबींचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. यासाठी चौदावा वित्त आयोग, मनरेगा, खासदार-आमदार स्थानिक विकास निधी, वैधानिक विकास महामंडळांतर्गतचा निधी, गौण खनिज विकास निधी यांतून मिळणाऱ्या निधीबरोबरच ग्रामपंचायतीला जनसुविधांसाठी मिळणारे अनुदान, महसुली अनुदान, पेसाअंतर्गत निधी व स्व-निधी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सेस आणि इतर जिल्हा योजनांमधून मिळणारा निधी खर्च करण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.


ग्रामस्तरीय समित्यांची स्थापना होणार

या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरीय समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शेतरस्ते तयार करण्यात येणाऱ्या ठिकाणालगतच्या शेतकऱ्यांचा समावेश असलेली शेतरस्ते समिती स्थापन करण्यात येईल. मात्र, ही समिती अनौपचारिक स्वरुपाची असणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@