भारत वि द. आफ्रिका टी-२०: दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेचा विजय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Feb-2018
Total Views |

 
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दरम्यान सुरु असलेल्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला पराभूत करून मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे. भारताचे १८९ धावांचे लक्ष्य अवघ्या १८.४ षटकांत दक्षिण आफ्रिकेने केले.
 
 
दक्षिण आफ्रिकेकडून हेन्रिक क्लासेनने दमदार खेळी केली असून कर्णधार जे.पी. ड्युमिनीची त्याला साथ लाभली. दोन्ही फलंदाजांनी अनुक्रमे ६९ आणि ६४ धावा ३० आणि ४० चेंडूंमध्ये केल्या आहेत. त्यांच्या झंझावाती खेळीमुळे दक्षिण आफ्रिका संघाला १८९ धावांचे लक्ष्य गाठणे सुकर झाले.
 
 
 
नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिका संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून शिखर धवन आणि रोहित शर्मा जोडी प्रथम फलंदाजीला आली. आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर रोहित शर्माला खाते उघडता आले नाही, तसेच सुरुवातीच्या काळात शिखर धवन देखील धावा काढण्यासाठी अडचणींचा सामना करत होता. मात्र त्यानंतर शिखरने जलदगतीने धावा काढल्या.
 
 
मनीष पांडे आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या धडाकेबाज खेळीमुळे पुढे भारतीय संघ १८९ धावांचे लक्ष्य ठेवू शकला. मनीष पांडेने ४८ चेंडूत ७९ तर महेंद्रसिंग धोनीने २८ चेंडूत ५२ धावा केल्या.
 
 
@@AUTHORINFO_V1@@