पीएनबी घोटाळा : निरव मोदी आणि मेहुल चौकसी यांचे समभाग जप्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली : प्रसिद्ध दागिने निर्माते निरव मोदी आणि त्यांचे सहकारी मेहुल चौकसी यांचे कंपनीतील समभाग जप्त करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या कंपनीच्या नऊ लग्झरी कार देखील जप्त करण्यात आल्या आहेत. पिएनबी घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ‘ईडी’कडून हे सगळे जप्त करण्यात आले आहे. 
निरव मोदी यांच्यावर ११ हजार ४०० कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप आहे. तसेच आत्तापर्यंत निरव मोदी यांची ५६४९ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
 
खोटी हमी देवून हा इतका मोठा घोटाळा करण्यात आला असून सध्या निरव मोदी यांच्या ११ राज्यांमधील ३५ ठिकाणांवर छापे मारण्यात आले आहेत. तसेच निरव मोदी यांच्या २९ जागा आणि १०५ बँक खाते देखील आतापर्यंत जप्त करण्यात आले आहेत. 
 
२०११ पासून निरव मोदी व्यवहारासाठी खोटा परवाना वापरात होते. निरव मोदी यांच्या विरुद्ध ईडी, सीबीआय, आयटी आणि डीआरआय हे विभाग कसून चौकशी करीत आहेत. 
 
@@AUTHORINFO_V1@@