कमला नेहरू पार्कचा कायापालट; आजपासून जनतेसाठी खुले होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Feb-2018
Total Views |
 
 
 
मुंबई : मलबार हिल येथील कमला नेहरु उद्यानचा कायापालट झाला आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते नव्या कमला नेहरु उद्यानाचे उद्घाटन केले जाणार असून आजपासून ते जनतेसाठी खुले होणार आहे. यावेळी शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री रामदास कदम, पालिका आयुक्त अजोय मेहता आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
 
 
मलबार हिलच्या कमला नेहरु पार्क मधील म्हातारीचा बूट मुंबईकर नागरिक आणि लहानग्यांसाठीच नव्हे तर मुंबईत येणाऱ्या सर्व पर्यटकांसाठी आवर्जून भेट देण्याचे ठिकाण आहे. कमला नेहरु पार्कला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. या उद्यानांचे सुशोभिकरणाच्या कामामुऴे हे उद्यान बंद होते. हे काम आता पूर्ण झाले असून उद्यानाचा कायापालट झाला आहे. नव्या रूपातील या उद्यानात अधिक आकर्षक, अधिक मनोरंजनात्मक व अधिक माहिती मिळणार आहे.
 
या उद्यानाला भेट देणाऱ्या पर्यटकांना येथील निसर्गाचा आणि सभोवतालच्या विहंगम दृष्याचा अनुभव घेता येणार आहे. सुप्रसिद्ध म्हातारीच्या बुटाची दुरुस्ती करून त्याला नव्या आकर्षक प्रकारची रंगरंगोटी करण्यात आली आहे. चौपाटीच्या बाजूकडील `क्वीन्स नेकलेस पॉइंट, इको पॉइंट आणि ऍम्फी थिएटर पॉइंट ठिकाणी व्ह्युइंग गॅलरीचे पर्यटकांना भुरळ पाडणार आहे. पर्यटकांच्या वाहनांसाठी वाहनतळ, प्रसाधनगृह, विविध झाडे, त्यावर चित्रात्मक व माहिती फलक लावले गेले आहेत. अनेक झाडांवर प्राण्यांची प्रतिकृती आकारली गेली आहे. पिण्याच्या पाण्याची सोय, रॅम्प वॉक, अत्याधुनिक रोपवाटिका, एलईडी पद्धतीचे दिवे, लहान- मुलांसाठी खेळणी, तसेच अशोक स्तंभाचा नवा लुक बघायला मिळणार आहे. कमला नेहरु उद्यान व हँगिंग गार्डन या दोन्ही उद्यानाच्या सुशोभिकरणासाठी तब्बल २० कोटी रुपयाचा खर्च आला आहे. यातील हँगिंग गार्डनचे काम अजून पूर्ण व्हायचे आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@