दिव्यांग साहित्य वितरण व मोफत महाआरोग्य व रक्तदान शिबीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Feb-2018
Total Views |
 
 
 
भंडारा : आरोग्य विभागामार्फत जिल्हाभर अभियान राबविण्यात येत असून याचा मुख्य उद्देश हा विभागाच्या आरोग्य विषयक असणाऱ्या योजनाची माहिती जनसामान्यत व्हावी व शासकीय आरोगय सेवा अधिकाधिक लोकाभिमुख व्हावी असा आहे. या अनुषंगाने जिल्हा रुग्णालय व आरोग्य विभाग जिल्हा परिषद भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने २४  फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा रुग्णालय भंडारा येथे दिव्यांग साहित्य वितरण व मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 
 
 
 
 
या शिबीराचे उदघाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते व आमदार डॉ. परिणय फुके यांच्या उपस्थितीत होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, आमदार राजेश काशीवार, ॲड. रामचंद्र अवसरे, चरण वाघमारे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा व सत्र संजय देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, जिल्हा पोलिस अधिक्षक विनीता साहू, आरोगय सेवेचे उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदु कुर्झेकर, आरोग्य सभापती प्रेमदास वनवे, नगराध्यक्ष सुनिल मेंढे उपस्थित राहणार आहेत.
 
 
 
या आरोग्य शिबीरामध्ये विभागामार्फत अंमलबजावणी होणाऱ्या सर्व योजनांची माहिती देणारे स्टॉल्स लावण्यात येणार आहे. ज्याद्वारे संबंधित रुग्ण व जनसामान्यांना त्यांच्या आरोग्य विषयक अडचणीविषयी बहुमोल मार्गदर्शन मिळेल. महाआरोग्य शिबीरामध्ये उपलब्ध तज्ञ सेवा जनरल फिजीशियन, जनरल सर्जरी, स्त्रिरोग व प्रसुती सेवा, बालरोग, नेत्ररोग, कान-नाक-घसा, अस्थिरोग, समतोल आहार मार्गदर्शन, स्वच्छतेविषयक मार्गदर्शन देण्यात येणार आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@