ओखी चक्रीवादळ नुकसानग्रस्तांसाठी मदतनिधी वितरीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Feb-2018
Total Views |

रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्याचे चंद्रकांत पाटील यांचे आदेश

 

 
 
मुंबई : ओखी या चक्रीवादळाने नुकसान झालेल्या नाशिक आणि कोकण विभागातील ८ हजार ४५ नुकसानग्रस्तांना ६ कोटी २ लाख ४३ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. या संदर्भातील निधीचे वितरण नाशिक आणि कोकण विभागीय आयुक्तांना करण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
 
 
डिसेंबर महिन्यात ओखी या चक्री वादळामुळे शेतकरी तसेच मच्छिमार बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानंतर नुकसानग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. नाशिक व कोकण विभागीय आयुक्तांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार या दोन्ही विभागीतील नुकसानग्रस्तांसाठी निधी वितरित करण्यात आला आहे. दरम्यान, ही रक्कम नुकसानग्रस्तांच्या थेट बँक खात्यात जमा करावी, तसेच या मदतीच्या रकमेमधून बँकांनी कोणत्याही प्रकारची वसुली करु नये, असे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.
 
 
 
 
 
नाशिक विभागामध्ये १ हजार ५२३ शेतकरी बांधवांना नुकसान झाले असून त्यासाठी २ कोटी ३७ लाख ३७ हजार रुपयांचा मदत निधी नाशिक विभागीय आयुक्तांकडे वर्ग करण्यात आला आहे. तसेच कोकण विभागात ६ हजार ५२५ नुकसानग्रस्तांना ३ कोटी ६५ लाख ६ हजार रुपयांचा निधी कोकण विभागीय आयुक्तांकडे वर्ग करण्यात आला आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@