दोंडाईचा अल्पवयीन मुलीवर अत्याचारना. रावलनी घेतली पिडीतेची भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2018
Total Views |
 

दोंडाईचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार


ना. रावलनी घेतली पिडीतेची भेट
 
 
 
विविध महिला संघटनांचे ना.रावल यांना निवेदन
शाळेस संरक्षक भिंत नाही.
शाळेची मान्यता रद्द करा.
विद्यार्थीनींना स्वरक्षणाचे धडे देण्यासाठी नियम करण्याची मागणी
धुळे क्राईम ब्राांचचे पथक जळगावात हजर
 
जळगाव-
दोंडाईचा येथे 5 वर्षीय बालिकेवर चॉकलेटचे आमिष देवून अत्याचार करण्यात आला. पिडीत मुलीला उपचारासाठी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले असता ही बाब उघडकिस आली. या घटनेचा तेली समाज तसेच अन्य समाजांकडून निषेध होत आहे. दरम्यान पिडीत बालिकेची व तिच्या कुटुंबियांची पर्यटन व रो.ह.यो. मंत्री जयकुमार रावल यांनी बुधवाररोजी भेट घेतली.यावेळी चिंतामणी फाउंडेशन, अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने व श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशिय युवक मंडळातर्फे ना.रावल यांना अत्याचार करणा­या नराधमास त्वरीत अटक करा या मागणीसाठी निवेदन दिले.
शिंदखेड तालुक्यातील दोंडाईचा येथील नुतन माध्यमिक हायस्कूल मध्ये शिक्षण घेत असलेल्या 5 वर्षीय बालिकेवर 8 फेब्राुवारीरोजी अत्याचार झाला ही घटना संस्थाचालकांनी दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी केला. या पिडीतेस उपचारासाठी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल्या नंतर तीच्यावर अत्याचार झाला असल्याची घटना उघकिस आली. घटनेची माहिती मिळताचा जळगाव शहरचे आ. सुरेश भोळे यांनी पिडित मुलीची व तीच्या नातेवाईकांची भोजन व्यवस्था करून आवश्यक ती मदत केली.
आणखी एका मुलीवर अत्याचार
दोडांईचा येथे आणखी एका मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला होता. असा गौप्यस्फोट ना.रावल यांनी याप्रसंगी केला.मात्र तिच्या पालकंावर कुणीतरी दबाव आणल्याने त्यांनी तक्रार दिली नाही असे त्यांनी सांगीतले. तशी व्हीडीओ क्लीप असल्याचे स्पष्ट केले.रावल यांनी पिडीत मुलीची विचारपूस करून कुटुंबियांशी चर्चा केली. यावेळी आ.सुरेश भोळे, तहसीलदार अमोल निकम, भगत बालाणी, सुनील माळी आदी उपस्थित होते. रावल यांनी पिडीत मुलीच्या कुटुंबाला सुरक्षा पुरविण्यात येईल. तसेच यामुलीच्या पदवी पर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी एक संस्थेकडे सोपविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
कोट - या घटनेला राजकिय वळण देवू नये. यापुर्वी अशीच घटना या शाळेत घडली. जर वेळीच तीला वाच्यता फोडली असती तर ही बालिका अत्याचारापासून वाचली असती. शाळेला संरक्षक भिंत नाही, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह नाही, सुरक्षारक्षक नाही. दरवर्षी अधिका­यांकडून निरीक्षण केले जाते. त्यांच्या लक्षात या बाबी येत नाहीत का ? सरकारने कोणत्याही शाळेस परवानगी देतांना सुरक्षा पाहणी केली पाहिजे. संस्थेच्या दबावामुळेच पिडीतेच्या परिवाराला जळगावला यावे लागले आहे. - रुपाली वाघ, चितांमणी फाउंडेशन, जळगाव
कोट – 15 जानेवारीला त्या विद्यालयात अशीच घटना घडली होती. परंतु संस्थाचालकांनी ती दाबून टाकली आहे. अत्याचार करणा­या नराधमास कठोर शासन व्हावे ही मागणी मुख्यमंत्र्यांपर्यत पोहचवावी. मुलीचा शिक्षणाचा सर्व खर्च सरकारने करावा आणि खटला जलद न्यायालयात चालवावा.- सरीता माळी, अध्यक्षा साहस फाउंडेशन
कोट
20 हजारांची पिडीतेला मदत
पिडीत बालिकेला न्याय मिळावा. या गुन्हयाच्या तपासासाठी महिला पोलिस अधिका­याची नियुक्ती करावी. या बालिकेच्या शिक्षणाचा संपुर्ण खर्च शासनाने करावा तसेच तीच्या साठी समुपदेशक लावण्यात यावा.यापुर्वी अशी घटना घडली तेथे घडली आहे परंतु भितीपोटी पिडीत मुलीचे पडीत तक्रार देण्यास धजत नाहीत.पिडीतेचा परिवाराला आर्थिक मदत म्हणून दोंडाईचा येथ्ील महिलांनी मिळून 20 हजार रुपये मदत दिली. - चंद्रकला सिसोदिया,स्विकृत नगरसेविका, दोंडाईचा नगरपालिका
याप्रसंगी सरीता माळी, निर्मला चौधरी, शोभा चौधरी, रेखा पाटील, जयश्री पाटील, कुसुम वाघमारे, तेली समाज नागपुर, डॉ.निता बेंडाळे(भोळे नागपूर)
दोंडाईचाचे महिला मंडळ ,चंद्रकला सिसोदिया, नगरसेविका, रोहिणी लिंभाडे , सुनिता गिरासे, मनिषा चौधरी, शकुंतला चौधरी ,छावा संघटनेच्या वंदना पाटील, शेभा चौधरी,यांनी देखील निवेदन देवून ना.रावल यांच्यासोबत चर्चा केली. महिलांच्या मागणीपाहून ना. जयकुमार रावल यांनी सकारत्मकता दर्शवत पिडीत मुलीच्या शिक्षणाचा खर्च शासन करेल यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच मुलीला न्याय मिळून देवू असे सांगीतले.
 
ना. रावलयांनी मानले जळगावकरांचे आभार
पिडीत बालिका दौडांईचा येथील आहे. परंतु तीला उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात आणले असता अत्याचाराला वाचा फुटली. या पिडीत मुलीसह तीच्या परिवाराची भोजन व अन्य आवश्यक व्यवस्था आ.सुरेश भोळे यांनी केली. येथील महिला संघटना पिडीतेच्यापाठिशी खंबीर उभ्या राहिल्या . तसेच माध्यमांनी बाजु मांडून धरली आणि पोलीस अधिक्षकांनी सुध्दा सहकार्य केले म्हणून ना. रावल यांनी आभार मानले.
 
ना.जयकुमार रावल जिल्हा सामान्य रुग्णालयात आले असता मुख्य वैद्यकिय अधिकारी चव्हाण हे बीडला गेले असल्याने अनुपस्थित होते तर डॉ.किरण पाटील हे सुध्दा अनुपस्थित होते.त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही.
पोलीस होण्याचा बालिकेचा मानस
पिडीत बालिका ही मोठी होवून पोलीस होईल व आरोपीस वठणिवर आणेल असा तीचा मानस आहे. यावरून तिच्यावर झालेल्या अत्याचाराची कल्पना येते.
ना.रावल - माजी मंत्री. आ.खडसे भेट
ना. जयकुमार रावल जिल्हा रुग्णालयात भेटी साठी आले परंतु आधी माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांच्या निवासस्थानी जावून त्यांनी सदिच्छा भेट घेतली. आ.खडसे यांनी सुध्दा ना.रावल यांचे स्वागत केले. े
@@AUTHORINFO_V1@@